नाशिक :बुधवारच्या बाजारात मोबाईल चोरी करणारी टोळी पोलिसांनी सापळा रचून पकडली आहे. यामध्ये युनिट एक ने कारवाई करत दोघांना अटक केली आहे.दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३५ मोबाईल हस्तगत केले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे आणि पोलीस शिपाई जुंद्रे यांना गुप्त माहिती मिळाली होती. यामध्ये संशयित चोर राहुल कासार वय १९ रा. मायको दवाखाना, पंचवटी नाशिक त्याचा सहकारी विकी उर्फ टेमऱ्या विजय भुजबळ वय १९ रा. मोरेमळा, हनुमानवाडी पंचवटी या दोघांना सापळा रचून पकडले आहे. पोलिसांना ३८ मोबाईल हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यातील अजून एक संशयित चिवड्या उर्फ सोनाल दशरथ बागड हा फरार आहे. पोलिसांनी कारवाईत एमएच १५ ईव्ही ८५८२ व गुन्ह्यात होंडा कंपनीची मोपेड दुचाकी वापरली होती. यासह ३५ मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चोरीच्या सर्व मोबाईलचा आयएमईआय क्रमांकाची नोंद पोलिसांनी केली असून त्याची यादी तयार केली आहे. तर यादी पोलिस आयुक्त कार्यालयात असून नागरिकांचे फोन चोरीला गेले आहेत त्यांनी पुरावा देऊन खात्री करून त्यांचे फोन घेऊन जावेत असे आवाहन करण्यात आले आहेत.