ylliX - Online Advertising Network

Market yard बाजार समितीत शेतकरीच येतल इतर कोणी आले तर गुन्हा दखल होणार

शेतकरी ,व्यापारी ,अडते, हमाल यांना कृषि उत्पन्न बाजार समिति पंचवटी व शरदचंद्र फ्रुट मार्केट नाशिक यांचेकडून सुचित करण्यात येत आहे की, दिनांक 30.3.2020 पासून दोन्ही मार्केटमध्ये फक्त शेतकरी लीलावा करिताच भाजीपाला व फळे घेऊन येतील. त्याठिकाणी शेतकरी कोणत्याही प्रकारे किरकोळ विक्री करणार नाहीत. जर अशी कृती केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे .Market yard

घरी रहा सुरक्षित रहा

तसेच शेतकऱ्यांना किरकोळ विक्री करावयाची असल्यास ,त्यांनी आपले फळे व भाजीपाला नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहरात 43 ठिकाणी निश्चित केलेले आहेत त्या ठिकाणी विक्री करावयाचा आहे. दोन्ही मार्केट च्या समोर रोड वरती कोणीही किरकोळ विक्री करणार नाही किंवा भाजीपाल्याचे भरलेले अथवा रिकामी वाहने उभे करणार नाहीत, केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे .त्याचप्रमाणे दोन्ही मार्केटमध्ये कोणतीही दुचाकी प्रवेश करणार नाही फक्त शेतकऱ्यांचे भाजीपाला घेऊन येणारे वाहने व किरकोळ विक्रेते यांचे ऑटोरिक्षा ,टमटम, छोटा हत्ती याच वाहनांना प्रवेश मिळणार आहे .कोणीही मार्केट च्या समोर दुचाकी पार्क करणार नाही केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे .Market yard

याबाबतचे सर्व शेतकरी ,किरकोळ विक्रेते व व्यापारी ,आडते यांनी नोंद घ्यावी .व आपल्या संपर्कातील सर्व संबंधितांना सोशल मिडीयाद्वारे ,व्हाट्सअप ग्रुप द्वारे अवगत करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती करून आव्हान करण्यात येत आहे. सर्वांना सहकार्य करण्याबद्दल शुभेच्छा. सर्वजण सहकार्य करतील याबद्दल सर्वांना शुभेच्छा .धन्यवाद! Market yard

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.