ylliX - Online Advertising Network

सीमा भागात मराठी माणूस निवडून यावा, फुटीचे राजकारण नको – उध्दव ठाकरे

 शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आवाहन

नाशिक :कर्नाटकात होत असलेल्या निवडणुकीमध्ये सीमा भागातील मराठी उमेदवाराला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यायला हवे. कुणीही कुठलेही फुटीचे राजकारण करू नये. मतदारांनी सुद्धा कुठलाही दुजाभाव ठेवू नये. सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे उभे राहावे. सीमा भागात शिवसेना उमेदवार देणार नाही. शिवसेना मराठी उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे उभी असून मराठी माणूस निवडून आणण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सेना कार्यकर्त्यांना केले. Marathi Ekikaran Samiti Belgaon Voters Karnataka Election Uddhav Thackeray Shivsena

सोबतच सीमाभागातील मराठी माणसांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातील सर्व सात मतदारसंघनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. Marathi people should elected Belgum border area politically divided vote

नाणार प्रकल्पाबाबत बोलतांना ठाकरे यांनी सांगितले की, नाणार प्रकल्पाची अधिसूचना आम्ही रद्द केली असून हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. नाणार प्रकल्प विदर्भात द्या अशी विदर्भातील भाजपा आमदारांचीच मागणी असून ती योग्यही आहे. देशात अनेक ठिकाणी जेथे समुद्र नाही तेथे सुद्धा तेल रिफायनरी आहेत. मुख्यमंत्री म्हणतात विदर्भात समुद्र नाही त्यांनी हे मोदींना सांगावे ते विदर्भात पाच मिनीटात समुद्र आणतील असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. आता रजनीकांत सुध्दा मोदींना घाबरतो अशी मिश्कील टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका शिवसेना स्वबळावर लढविणार असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीने त्याबाबत निर्णय घेतला आहे त्यात बदल केला जाणार नाही. शिवसेना भाजपा स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याने कॉँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. Marathi Ekikaran Samiti Belgaon Voters Karnataka Election Uddhav Thackeray Shivsena

दोन्ही काँग्रेसचे मन किती जुळले हे माहीत नाही पण ‘लकवा’ मारलेले दोन्ही हात एकत्र आले या शब्दात त्यांनी आघाडीचा समाचार घेतला.त्याबरोबरच  विधान परिषद निवडणूकीत सहा पैकी तीन जागांवर कागदारवर शिवसेनेचे सदस्य संख्या बघता निवडून येण्याची शक्यता असल्याने पक्षाने उमेदवार केले आहे. स्थानिक पातळीवर जे जमेल ते करा असे आदेश विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार काय? यावर  त्यांनी ‘वनगा’ यांच्या कुटुंबातील कोणी इच्छुक असल्यास आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकतो. अन्यथा अन्य उमेदवार देण्याचा पर्याय खुला आहे. ही निवडणुक आम्ही लढवु असेत्यांनी सांगितले. चिंतामन वणगा यांनी आपले संपूण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्वासाठी खर्ची घातले. मात्र याच वनगांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटंबीयांना भेटीसाठी महिनाभर ताटकळत ठेवत साधी भेट देखील घेतली नाही. Marathi Ekikaran Samiti Belgaon Voters Karnataka Election Uddhav Thackeray Shivsena

दीड महिन्यापासून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी मला सर्व ‘एसएमएस’ दाखवले. महिनाभर मुख्यमंत्री केवळ ‘ओके’ असा प्रतिसाद देत होते. मात्र ताटकळत ठेऊन त्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे मी त्यांना शिवसेनेते प्रवेश दिला. शिवसेना वनगा यांच्या कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Marathi Ekikaran Samiti Belgaon Voters Karnataka Election Uddhav Thackeray Shivsena

Advertise With us, Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “सीमा भागात मराठी माणूस निवडून यावा, फुटीचे राजकारण नको – उध्दव ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.