ylliX - Online Advertising Network

मराठी भाषा दिवस – ‘एक परिच्छेद विकिपिडियावर

मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो. हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.

२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन, या वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे गेट वे ऑफ इंडियावरील भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच यानिमित्ताने आणखी एक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, ती म्हणजे ‘एक परिच्छेद विकिपिडियावर’. यात मराठी भाषा गौरव दिनी, जगभरातील मराठी भाषकांनी मराठी देवनागरी लिपीतील किमान १ परिच्छेद मजकूर ‘मराठी विकिपीडियावर’ टाईप करावयाचा आहे.

कुसुमाग्रज :

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. शिरवाडकरांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ‘ध्रुव मंडळा’ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.

पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांनी नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.

१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.

वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.

साहित्य

कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कविता संग्रह

 • अक्षरबाग (१९९९)
 • किनारा(१९५२)
 • चाफा(१९९८)
 • छंदोमयी (१९८२)
 • जाईचा कुंज (१९३६)
 • जीवन लहरी(१९३३)
 • थांब सहेली (२००२)
 • पांथेय (१९८९)
 • प्रवासी पक्षी (१९८९)
 • मराठी माती (१९६०)
 • महावृक्ष (१९९७)
 • माधवी(१९९४)
 • मारवा (१९९९)
 • मुक्तायन (१९८४)
 • मेघदूत(१९५६)
 • रसयात्रा (१९६९)
 • वादळ वेल (१९६९)
 • विशाखा (१९४२)
 • श्रावण (१९८५)
 • समिधा ( १९४७)
 • स्वगत(१९६२)
 • हिमरेषा(१९६४)

निबंध संग्रह

 • आहे आणि नाही (पुस्तक) – लघुनिबंध संग्रह
 • प्रतिसाद (पुस्तक) – लघुनिबंध संग्रह

नाटक

 • ऑथेल्लो
 • आनंद
 • आमचं नाव बाबुराव
 • एक होती वाघीण
 • कौंतेय
 • जेथे चंद्र उगवत नाही
 • दिवाणी दावा
 • दुसरा पेशवा
 • दूरचे दिवे
 • देवाचे घर
 • नटसम्राट
 • नाटक बसते आहे
 • बेकेट
 • मुख्यमंत्री
 • ययाति देवयानी
 • राजमुकुट
 • विदूषक
 • वीज म्हणाली धरतीला
 • वैजयंती

कथासंग्रह

 • अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
 • काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
 • फुलवाली (कथासंग्रह)
 • बारा निवडक कथा (कथासंग्रह)
 • सतारीचे बोल (कथासंग्रह)

कादंबरी

 • कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)
 • जान्हवी (कादंबरी)
 • वैष्णव (कादंबरी)
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.