शिवसेना आमदारांच्या दारात मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन

नाशिक : नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून सोमवारी शिवसेनेच्या देवळाली मतदारसंघातील आमदार योगेश घोलप यांच्या घराबाहेर मराठा आक्रोश वारी नेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार योगेश घोलप गैरहजर असल्यामुळे त्याचे वडील आणि माजी मंत्री बबन घोलप यांनी समन्वयकांशी चर्चा केली.

यावेळी मी असो वा माझा मुलगा, आम्ही राखीव मतदारसंघातुन निवडून येत असलो तरी मी स्वतःला मराठा समाजाचाच आमदार समजतो. त्यामुळे मराठा आरक्षणाविषयी शिवसेनेची वेगळी भूमिका झाली तर माझा मुलगा थेट राज्यपालांकडे जाऊन आमदारकीचा राजीनामा देईल असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मी सर्व आंदोलकांचे स्वागत करतो. आपण समाजासाठी आंदोलन करीत आहात. लोकप्रतिनिधींना जागे करीत आहात. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देत आहेत. आम्ही मराठा समाजाच्या अनेक आंदोलनात थेट सहभागी झालो आहोत. त्यासाठी आमच्यावर टीका आणि आरोपही झाले. मात्र ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांच्याशी आम्ही प्रामाणीक राहू. तो बाणा सोडणार नाही असे सांगितले. त्यानंतर आमदार घोलप यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवर संपर्क करुन त्यांचे म्हणने समजुन घेतले.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.