मराठा क्रांती मोर्चा, गोदावरीत उतरून महिलांनी केले आंदोलन, सरकारला इशारा!

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये आंदोलनाला सुरुवात केली. त्यात सटाणा येथे युवकांनी जलसमाधीचा प्रयत्न केला होता, तर गंगापूर धरणात मुख्यमंत्री यांच्या फोटोला जलसमाधी दिली होती, मात्र यात आता महिलावर्गाने देखील सहभाग नोंदवला असून, गोदावरी पात्रात उतरून आंदोलन करत इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने सुरू आहे. मात्र या आंदोलनाला पोलिस आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. Maratha Kranti Morcha Reservation issue women coordinators godavari agitation

 

सोबतच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आंदोलन करू नये यासाठी नोटिसा दिल्या आहेत. मात्र आता स्थिती पाहता जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयकांनी आंदोलनात पुढाकार घेतला आहे. Maratha Kranti Morcha Reservation issue women coordinators godavari agitation

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनच आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यापुढे नाशिक जिल्हयात आंदोलनाचे नेतृत्व महिला सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी सकाळी महिलांनी गोदावरी परिसरात आंदोलन करीत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. हा इशारा असून लवकरच निर्णय घ्या असे देखील बजावले आहे.

नाशिकमध्ये शुक्रवारी महिला आंदोलकांनी पाण्यात उतरून आंदोलन केल्याने प्रशासनासमोर आंदोलकांना रोखण्याचे आवाहन निर्माण झाले आहे.

Join Us Locally : WhatsApp Group : https://chat.whatsapp.com/8Y4rF0ioa954F7uoqTrh3H

Maratha Kranti Morcha Reservation issue women coordinators godavari agitation
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.