ylliX - Online Advertising Network

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार समितीला कॅबिनेट दर्जा- मुख्यमंत्री

मराठा क्रांती मोर्चा; आज काय घडले; काय बोलले मुख्यमंत्री?

मराठा आरक्षणासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी मराठा क्रांती मूकमोर्चाचे वादळ आज मुंबईत धडकले. भायखळा येथील जिजामाता उद्यानातून महिलांच्या नेतृत्त्वात न‍िघालेल्या मराठा मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर झाला. आझाद मैदानावर तरुणींनी भाषणे दिली. दुसरीकडे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने विधानसभेत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा

1) मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार समितीला कॅबिनेट दर्जा देणार.

2) समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही.

3) राज्य मागास आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार.

4) सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून, सध्या हे प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे आहे.

5) तीन लाख मुलांना कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण देणार.

6) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुण बेरोजगारांना जास्तीत जास्त लाभ देण्यात येईल.

7) मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या EBC मर्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्के करण्यात येणार आहे.

8) 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत देणार.

9) ओबीसी विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात, तितक्याच मराठा विद्यार्थ्यांना मिळणार.

10) 605 अभ्यासक्रमांमध्ये मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

11) कोपर्डीचा खटला अंतिम टप्प्यात आला आहे, लवकरच निर्णय येणार.

12) प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची निर्मिती करणार, प्रत्येक जिल्ह्यातील हॉस्टेलसाठी 5 कोटी रुपयांचे अनुदान देणार.

13) बार्टीच्या धर्तीवर सारथीचं सक्षमीकरण करण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन सुपूर्द

राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाने क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केले. आज सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मोर्चा दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला. आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला. 6 मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सुपूर्द केले.

काय बोलल्या तरुणी?

1) आरक्षण नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही प्रवेश मिळत नाही, तरुणींनी आझाद मैदानात मांडली व्यथा, मराठा समाजाला आरक्षण देता की जाता, तरुणींचा सरकारला निर्वाणीचा इशारा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजातील तरुणींची मागणी.

2) साहेब… काय झाले.. वर्ष झाले.. आपल्या आश्‍वासनाचे काय झाले, ही माझी बहिण अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. लवकरात लवकर याचा निकाल लावा. तिला न्याय द्या साहेब…

मुस्लिम समाजाकडून अल्पोहार आणि पाणी वाटप

मुस्लिम समाजाने आज मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांना अल्पोहार आणि पाणी वाटप केले. यावेळी मराठा आंदोलकांनीही टाळयांच्या कडकडाटात त्यांचे आभार मानले. जेजे उड्डाणपूल सुरु होण्याआधी नागपाडा येथे सिग्नलजवळ खास स्टॉल उभारण्यात आला होता. आंदोलक तिथे दाखल होताच मुस्लिम नागरीकांनी अल्पोहाराचे वाटप सुरु केले. नागपाडा फ्रूट आणि व्हेजिटेबल असोसिएशन, ऑल इंडिया मिल्ली कौन्सिल आणि रेहमानी ग्रुप व रजा अकादमी, जमात ए उलेमा यांनी तीन स्टॉल लावले होते. त्यामाध्यमातून अल्पोपहार व पाणी वाटप करण्यात आले.

विधीमंडळात काय घडले?

1)मोर्चाला सुरुवात होताच भाजपाचे आमदार मंत्रालयाजवळच्या आयनॉक्स थिएटरपासून घोषणाबाजी करत सभागृहात दाखल झाले. विधानभवनाच्या पाय-यांवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमने-सामने आले त्यावेळीही घोषणाबाजी झाली.

2) यावेळी राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. सभापतींसमोरच्या मोकळया जागेत सर्वपक्षीय आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

3) विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत हे सरकार आल्यापासून या विषयावर अनेकदा चर्चा झाली मात्र आरक्षण मिळालं नाही त्यामुळे चर्चा नको आरक्षण द्या अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली. मोर्चात सहभागी व्हायचं असल्यामुळे आजचं कामकाज स्थगित करा अशी मागणीही त्यांनी केली.

4) फेटे बांधून विरोधी पक्षाचे आमदार मोर्चात सहभागी झाले.

कोण काय बोलले?

1) मुंबईतील मोर्चा समारोपाचा समजू नये, ही सुरुवात आहे : निलेश राणे

2) शिवसेनेला डिवचू नका, 50 वर्षे सत्तेत होते तेव्हा मराठ्यांची आठवण आली नाही, गुलाबराव पाटील यांचे जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

3) मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं : खासदार संभाजीराजे छत्रपती

4) मुंबईत निघालेल्या मराठा मोर्चाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मराठा समाजाच्या सर्वसमावेशक प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहील, अशी अपेक्षा

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.