ylliX - Online Advertising Network

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाला तेथे आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंब्रा रेतीबंदर येथे आज सकाळी आणखी एक मृतदेह सापडला. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ज्या गाडीत जिलेटिन कांड्या सापडल्या. त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुब्रा रेतीबंदर येथे सापडला होता. त्याच ठिकाणी आज सकाळी आणखी एक मृतदेह मिळाल्याचे एकच खळबळ उडाली.

शेख सलीम अब्दुल (वय ४८, रा. रेतीबंदर, मुंब्रा) असे मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी तो रुग्णालयात पाठविला आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह रेतीबंदर येथे सापडला होता. त्यांचे हातपाय बांधले होते. तसेच त्यांच्या तोंडाला मास्क असताना आत काही रुमाल आढळून आले होते. याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नीने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनीच त्यांचा खुन करविला असा आरोप केला आहे. त्यामुळे त्या परिसरात दुसरा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.