ylliX - Online Advertising Network

Mansukh Hiren murder मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, ATS DIG शिवदीप लांडे यांची FB पोस्ट

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तशी माहिती खुद्द एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी दिली आहे. लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केलीय. त्या पोस्टमध्ये त्यांनी सॅल्यूट ठोकणारा एक फोटो टाकला आहे. तर अती संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचं त्यांनी म्हटलंय. (Mansukh Hiren murder case finally solved ATS DIG Shivdeep Lande’s Facebook post)

 

“अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण ATS पोलीस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. ज्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रंदिवस एक केला आहे. त्यामुळे या केसमध्ये न्यायपूर्ण परिणाम समोर आला आहे. ही केस माझ्या संपूर्ण पोलीस करिअरमधील सर्वात जटील केसमधील एक आहे”, असं शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. Mansukh Hiren murder

 

अति संवेदनशील मनसुख हिरेन मर्डर केस की गुत्थी सुलझी। मैं अपने पूरे ATS पुलिस फ़ोर्स के सभी साथियों को दिल से सैलूट करता…

ATS चे DIG शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट खालील लिंक क्लिक करा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=289814455834737&id=100044185551514

मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे (५१) आणि बुकी असलेला नरेश गोर (३१) याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्यानंतर राज्याच्या एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणातील गुंता सुटला असल्याची माहिती दिली आहे.

तसेच शिवदीप लांडे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून याप्रकरणी न्याय्य पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून अभिवादन करतो. माझ्या पोलिस कारकीर्दीची आजपर्यंतची ही सर्वात जटिल घटना होती. असे नमूद केले आहे. सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला हवा आहे. त्यासाठी सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. Mansukh Hiren murder

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.