ylliX - Online Advertising Network

विवाहाचे आमिष महिलेवर बलात्कार , गुन्हा दाखल

नाशिक : लग्न करतो, तुझा मुलाचा सांभाळ करतो असे आमिष दाखवत एकाने 30 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केला असून तिच्या लहान मुलाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. म्हसरूळ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

सविस्तर वृत्त असे की, पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहिता ही  30 वर्षांची आहे. तिला पहिल्या पतीपासून एक लहान मुलगा आहे. या प्रकरणी पीडित महिलेची ओळख संशयित अशोक साहेबराव बहिरट ( 40, रा. अवनखेडता. दिंडोरीजि. नाशिक) याच्याशी झाली होती. नंतर ते दिनांक  6 जानेवारी 2010 ते 5 ऑगस्ट 2018 या दरम्यान संशयित अशोक बहिरट याने विवाहितेशी झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध प्रस्थापित होत सोबत राहत होते.  बहिरट याने पहिल्या पत्नीला सोडून दिले नंतर याने पिडीत विवाहितेला लग्न करशील कार माझ्या मुलाला सांभाळणार का असे विचारत विश्वास निर्माण केला. पीडितेने त्याला होकार दिला. संशयित अशोक बहिरट याने दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या गर्गे पार्कमध्ये खोली घेतली आणि तेथे त्याने विवाहितेवर बलात्कार करून शोषण केले आहे.

संशयिताने सात वर्षांपासून सोबत राहूनही विवाह केला नाही. पीडित विवाहितेने अशोक बहिरट याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असूनतपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.