ylliX - Online Advertising Network

Malegaon Corona Number Increasing आणखी 7 कोरोना संसर्गित; मालेगावात आता 47 कोरोनाबाधित – जिल्ह्यात संख्या 55

मालेगाव शहरात रोजच कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असून आज (दि. 16) सकाळी एका रुग्णाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संध्याकाळी पुन्हा 7 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 47 इतकी झाली आहे. तर नाशिक जिल्ह्याने 55 रुग्णांची मजल गाठली असल्याची माहुती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. Malegaon Corona Number Increasing

अशी आहे मालेगावातील बाधित रुग्णांची संक्षिप्त माहिती :-

  1. 41 वर्ष पुरुष – मालेगाव
  2. 36 वर्षे पुरुष – नयापुरा
  3. 14 वर्षे महिला – कमालपूरा
  4. 15 वर्षे पुरुष – जामा मशीद
  5. 23 वर्षे महिला – इस्लामपूर
  6. 25 वर्षे पुरुष बेलबाग
  7. 15 वर्षे पुरुष दातार नगर

हे सर्व रुग्ण आधी कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांच्या जवळून संपर्कात आलेले होते. व त्यांना आधीपासूनच शासकीय विलगिकरणात ठेवण्यात आले होते.

सकाळी आलेल्या रिपोर्ट्स मध्ये मालेगाव येथील 64 वर्षांच्या रुग्णाला कोरोना झाल्याचे दिसून आले. सदर बाधितास एंजिओप्लास्टीसाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिक शहरातील सातपूर अंबड लिंक रोड वरील संजीव नगर परिसरात राहणाऱ्या 63 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे अहवालाद्वारे समोर आले.

दरम्यान, दिलासादायक बातमी म्हणजे नामपूर येथील कोरोना संसर्गित डॉक्टरांच्या रुग्णालयातील सर्व 28 जणांच्या स्टाफचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

दुपारी 3:00 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोरोना पाॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 55 इतकी झाली आहे.

मालेगाव : 47
नाशिक शहर : 5
जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील 03
एकूण : 55

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.