मालेगाव मध्ये कोरोना रुग्ण शब्दश: स्फोट झालेला दिसुन येत आहे. बुधवारी (दि. 29) रात्री उशिरा तीन टप्प्यांत अनुक्रमे २०, २४ व २७ आणि आधी दिवसा ११ असे दिवसभरात ८२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. Malegaon corona infections
या मध्ये एका तीन तीन महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली असून मोठ्या संख्येने पोलिस व राखीव दलाच्या जवनांचाही समावेश असल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता मालेगावात २५३ तर नाशिक जिल्ह्यात २७६ रुग्ण कोरोना संसर्गित आहेत.
नाशिकच्या नव्या लॅब मधून आलेल्या 91 पैकी 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हेसर्व मालेगाव मधील स्वॅब होते.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे नाशिक दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र सरकार आता मालेगाववर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मालेगाव शहरात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहेत. यामुळे करोनाविरूध्दच्या लढाईत हे डॉक्टर्स आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे मालेगावातून करोना हद्दपार करण्यासाठी आता संस्थात्मक क्वॉरंटाइन केले जाईल, असे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन मालेगाव यशस्वितेसाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोरोनाच्या लढाईत राज्यात सर्वच ठिकाणी यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. मात्र, दुर्दैवाने पोलिसांसह डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटना सुरूच आहेत. यापुढे अशा हल्लेखोरांना आधी प्रेमाने सांगा मग पोलिसी खाक्या दाखवा, असे आदेश पोलीस खात्याला देण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. या हल्लेखोरांवर राज्य शासनाच्या कडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. Malegaon Corona infections
अशी आहे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी :
नाशिक महापालिका
पॉझिटिव्ह : 10
मृत्यूः 00
करोना मुक्त : 03
नाशिक ग्रामीण :
पॉझिटिव्ह: 11
मृत्यूः 00
करोना मुक्त: 02
मालेगाव महापालिका
पॉझिटिव्ह : 253
करोनामुक्त : 06
मृत्यूः 12
जिल्हा बाहेरील
पॉझिटिव्ह : 02
करोना मुक्त: 00
मृत्यूः 00
नाशिक जिल्हा एकूण
पॉझिटिव्ह : 276