Malegaon Corona 13 April मालेगावात एक पॉझिटिव्ह; शहरातील आकडा 29 वर; जिल्ह्यात 33 कोरोना रुग्ण

नाशिक : मालेगाव शहर करोना संसर्गाचे हाॅटस्पाॅट ठरत अाहे. मालेगाव शहरात सोमवारी पुन्हा एक करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.त्यामुळे मालेगाव येथील रुग्णसंख्या २९ वर पोहोचली आहे. Malegaon Corona 13 April

जिल्ह्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण मालेगावमध्ये सापडत आहेत. सोमवारी मालेगावचे आठ अहवाल मिळाले. यामध्ये सात अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा व्यक्ती पूर्वीच्या पॉझिटीव्ह कुटुंबातील निकटवर्तीय सदस्य असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे मालेगावमधील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २९ वर पोहोचली आहे. यामध्ये एका मृताचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली आहे.

रविवारी २४ तासांत शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा १८ ने वाढला होता. यामुळे रुग्णसंख्या अचानक २७ च्या घरात पोहोचली होती. तर नाशिक जिल्ह्यात आज सिन्नर तालुक्यातील एक रुग्ण सिद्ध झाल्यामुळे रुग्णसंख्या आता ३५ वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे एका रुग्णाला आधीच प्राण गमवावे लागले असल्याने शहरातील करोना संक्रमण रोखणे हे यंत्रणांपुढील मोठे आव्हान बनले आहे. Malegaon Corona 13 April

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.