मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : कर्नल पुरोहित यांची याचिका एन.आय.ए विशेष न्यायालयाने  फेटाळली

नाशिक : आज एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या ले. कर्नल श्रीकांत पुरोहित यांची याचिका एन.आय.ए ( नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी स्पेशल कोर्ट ) फेटाळली आहे. पुरोहित यांच्या मागणीनुसार त्याच्यावर लावण्यात आलेले बेकायदेशीर कृत्य विरोधी कायद्याचे कलमे अर्थातच यूएपीए रद्द करण्यात यावे अशी याचिका त्यांनी कोर्टात दाखल केली होती.Malegaon Blast: NIA Court Refuses To Drop UAPA Charges Against Col. Shrikant Purohit 

न्यायमूर्ती विनोद पाडळकर यांच्या न्यायालयात अपिलावर सुनावणी झाली,यावेळी पुरोहित आणि अन्य असे संशयित यांच्या अपिलावर एकत्र सुनावणी केली असून, या प्रकरणा संधर्भात २६ ऑक्टोबर रोजी पुढील तारीख दिली आहे.न्यायालयाने स्पष्ट केले की या प्रकरणी मिळालेले सामग्री (पुरावे) कर्नल पुरोहित यांच्यावर संबंधित कलमाखाली खटला चालविण्यास पुरेशी आहे.Malegaon Blast: NIA Court Refuses To Drop UAPA Charges Against Col. Shrikant Purohit 

दरम्यान ८ ऑक्टोबर रोजी एनआयए (विशेष राष्ट्रीय तपास संस्था) न्यायालयाने अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. कारण न्यायालयात ते उपस्थित राहिले नाही.या आगोदर सर्वोच्च न्यायालयाने देखील ४ सप्टेंबर रोजी ले.कर्नल पुरोहित यांची याचिका फेटाळली आहे. एटीएसने केलेल्या तथाकथीत छळाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी विनंती पुरोहित यांनी केली होती.

मालेगावच्या अंजुमन आणि भिकू चौकात  २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला , तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते.नोव्हेंबर २००८ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने या संदर्भात ले.क पुरोहितसह ११ जणांना ताब्यात घेतले होते. नंतर हे प्रकरण २०११ मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आले.या प्रकरणात पुरोहित हे ९ वर्षे तुरुंगात होते, सर्वोच्च न्यायालयाने पुरोहित यांना २१ ऑगस्ट १७ ला जामिनावर सोडले होते.

Malegaon Blast: NIA Court Refuses To Drop UAPA Charges Against Col. Shrikant Purohit 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.