ylliX - Online Advertising Network

पुन्हा गाड्यांची जाळपोळ, मखमलाबाद येथील घटना

नाशिक : नाशिक मध्ये अजूनही गाडी जाळपोळीच्या सुरूच आहे. यामध्ये रविवारी मध्यरात्री मखमलाबाद गावाजवळील रॉयल टाऊन बीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींना पेटवल्या आहे. अज्ञात समाजकंटकांनी हा प्रकार केला आहे. दुचाकी नेमक्या कोणी व का जाळल्या याचे कारण अजून समजू शकले नाही.makhmalabad area unknown person burns 4 bikes

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार परिसरात दहशत माजवणे आस हेतू असावा असे पोलिसांनी सागितले आहे.ज्या सोसायटी हा प्रकार घडला तेथे आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.makhmalabad area unknown person burns 4 bikes

विजय भामरे येथील रहिवासी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोसायटीतील सभासदांनी इमारतीच्या पार्किंगमध्ये रविवारी (दि़१५) नेहेमीप्रमाणे आपल्या दुचाकी उभ्या करण्यात आल्या होत्या. मध्यरात्री सुमारे दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास परिसरातील काही अज्ञात समाजकंटकांनी दहशत पसरविण्याच्या हेतूने पार्किंगमध्ये लावलेली भामरे यांच्या मालकीची प्लेटिना ( एमएच १५, एफके ९४१५), शारदा बुरकुले यांची हिरोहोंडा पॅशन (एमएच १५, डीडी ०११०), संतोष मोरे यांची प्लेजर (एमएच १५, डीक्यू ९४२२) तसेच सुरेश मोरे यांची एम ८० (एमएच १५, एक्स ३५१०) या चार दुचाकींना आग लावली़ होती. जळत असल्याचा वास आल्याने नागरिक जागे झाले व त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली आहे.makhmalabad area unknown person burns 4 bikes

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.