nashik kalyan local railway नाशिक कल्याण लोकल चाचणी होणार लवकरच धावणार लोकल

nashik kalyan local railway
local train

शिक्षण, व्यापार, नोकरी निमित्त नाशिक- मुंबई प्रवास करणाऱ्यांची हजारो लोकांची संख्या रोज मोठ्या प्रमाणावर आहे. नाशिकहून मुंबईकडे जाणारे विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांचीही संख्याखूप मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर पंचवटी नंतर रोजची लोकल सेवा सुरु झाल्यास तुलनेने कमी खर्चात प्रवासाची सोय उपलब्ध होऊन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. त्या बद्दल अनेक वर्षापासून नागरिक मागणी करत आहेत.nashik kalyan local railway

आता मात्र ही बहुप्रतिक्षित नाशिक- कल्याण लोकल सेवा दृष्टीपथात दिसत आहे. यात मेमूच्या चाचणीसाठी लखनऊ येथील रिसर्च डिझाइन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) हिरवा कंदील दाखविला आहे. आता ल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते.

नाशिक- कल्याण दरम्यान इगतपुरी ते कसारा घाटातील प्रवास हा लोकलसाठी अशक्य असल्याने या ठिकाणी लोकलऐवजी मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पज युनिट) सुरु करण्यासाठी रेल्वेने प्रयत्न केले. त्यासाठी रँक देखील उपलब्ध करुन घेतला. मात्र या मार्गावरील चाचणीसाठी आरडीएसओ हे तयार होत नसल्याने नाशिक- कल्याण लोकल सेवा सुरु होण्याचा प्रवास रखडला होता. मात्र गोडसे यांनी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे हा प्रस्ताव लावून धरल्याने अखेर सर्व अडचणी दूर होत आता मध्य रेल्वेच्या आरडीएसओने मेमूची चाचणी घेण्यासाठी परवानगी दिली आहे. ही चाचणी केव्हाही होण्याची शक्यता आहे. चाचणी यशस्वी झाली तर नाशिक- कल्याण दरम्यान रोज मेमू धावताना दिसणार आहे.nashik kalyan local railway

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.