ylliX - Online Advertising Network

महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू , विजेच्या खांबावर काम करताना धक्का

महावितरण कर्मचाऱ्याचा खांबावर काम करताना विजेचा धक्का लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू

महावितरण येथे काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाचा सुरक्षा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज दुपारी इंदिरानगर भागात विजेच्या खांबावर काम करत असतांना विजेचा जोरदार झटका लागून महावितरणचा कर्मचारी जागीच ठार झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, विजेचा लपंडाव सर्वाना नवीन नाही. तसाच काहीसा प्रकार इंदिरानगर येथे झाला होता. सर्व प्रकारचे तपासणी  झाल्यावर इंदिरानगर परिसरातील वीजपुरवठा बंद केल्याचं इतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कर्मचारी  समीर वाघ यांना सांगितलं होते. इंदिरानगरमधील मोदकेश्वर चौकातील देवदत्त सोसायटीचा वीजपुरवठ्याचा बिघाड दुरूस्तीची तक्रार निवारण करण्यासाठी वीज वितरण कर्मचारी समीर वाघ (२६), हेमराज कडेकर (३५) हे दोघे दाखल झाले.

वाघ हे बिघाड दुरूस्तीसाठी खांबावर चढले होते. त्यावेळी वीजप्रवाह सदर भागात बंद करण्यात आलेला होता. हेमराज हे खांबाजवळ उभे होते. काही मिनिटे झाल्यानंतर अचानकपणे या भागातील वीजपुरवठा सुरू झाल्याने खांबावर दुरूस्ती करणाºया वाघ यांना वीजेचा झटका बसला.

समीर वाघ कामासाठी खांबावर चढले होते. मात्र तेव्हा वीजप्रवाह  सुरुच होता त्यात त्यांना विजेचा जबरदस्त जोरदार झटका बसला होता. झटका इतका तीव्र होता की ते तत्काळ मयत झाले आणि त्याच अवस्थेत ते खांबावर लटकले होते. यानंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ झाले आणि समीर वाघ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल होते.

मात्र उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला आहे. कर्मचारी वर्गाच्या बेजाबदार कामामुळे आणि संवाद न केल्याने समीर वाघ यांना आपला जीव गमवावा लागला आहे. थोडे लक्ष देवून इतर साथीदारांनी जर काम केले असते तर समीर वाघ यांचा मृत्यू झाला नसता असे प्रत्यक्ष दर्शी नागरिक सांगत आहे. पोलिसांनी प्राथमिक तपसा करत घटनेची नोंद केली आहे.इंदिरानगर पोलिस घटनास्थळी दाखल असून पुढील तपास सुरु आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.