ylliX - Online Advertising Network

शिवसेनेत भुजबळ यांचा प्रवेश – खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

सध्या नाशिक आणि राज्यात शिवसेनेत छगन भुजबळ प्रवेश करणार का ? यावर जोरदार चर्चा सुरु आहे. तर जिल्ह्यात अनेक तर्क लावले जात आहेत. त्यात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दोन दिवसीय दौरा सुरु आहे. त्यामुळे पुन्हा भुजबळ यांचे नेमके काय होणार यावर चर्चा सुरु झाली आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत याना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रवेशाविषयी त्यांना विचारले असता , राऊत म्हणाले की “ते आहे तिथेच खुश आहे, असे खुद्द भुजबळांनीच सांगिल्याने त्यांच्या प्रवेशाविषयी मी बोलणे योग्य होणार नाही, असे सांगत खासदार राऊत यांनी उत्तर देणे टाळले आहे.

Chaggan Bhujbal

बुधवारपासून (4) दोन दिवसांच्या दौर्‍यावर संजय राऊत आले आहेत. गणेश विसर्जनानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे आगोदर सर्व शिवसैनिक व पदाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की , ” शिवसेनेच्या आजच्या बैठकीत छगन भुजबळ हा चर्चेचा विषयच नव्हता. भुजबळ ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते असून, त्यामुळे दुसर्‍या पक्षातील नेत्याविषयी चर्चा करण्याचे काही कारणच नाही, असे सांगून खासदार राऊत यांनीही भुजबळ यांच्याविषयी बोलणे टाळले आहे.

पुढे म्हणाले की “दोन दिवसांपूर्वी त्यांनी मी आहे तिथेच खुश आहे, अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने ते आपण गांभिर्याने घेतले असून, त्यांच्या भावनेचा आपण सन्मान केला पाहिजे. यामुळे त्यांच्या प्रवेशाविषयी मला विचारण्याऐवजी त्यांनाच विचारणे योग्य असल्याचे” राऊत यांनी सांगितले आहे.

Gaunt Nashik Developing Nagpur pharma industries MIHAN Project Sanjay Raut, shivsena nashik midc satpur ambad खासदार संजय राऊत करवाढ नाशिक शिवसेना अंतर्गत गटबाजी नाशिक न्यूज उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रभारी विधानसभा निवडणूक mihan project status nagpur companies sez maharashtra office address details
Sanjay Raut

यावेळी जेव्हा आढावा बैठकी सुरु होती तेव्हा येवला विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी भुजबळांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. मात्र यावेळी शिवसैनिकांनी राऊत यांना विचारले की, भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याचे तुम्ही संबंधितांना आश्वासन दिले आहे का? मात्र बैठकीचा भुजबळ हा विषयच नसल्याने त्याविषयी चर्चाच झाली नसल्याचा दावा शिवसेना नेते खासदार राऊत यांनी केला आहे.

पक्षाच्या वाईट काळात आणि ज्यांनी पक्षासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या त्यांना पक्ष कधीही वार्‍यावर सोडणार नाही. कार्यकर्त्यांच्या भावना महत्वाच्या असून, त्या जपल्या जातील, असे सूचक वाक्यही त्यांनी येवला मतदार संघाच्या प्रश्नानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. त्यामुळे भुजबळ शिवसेनेत जाणार का याचे कोणतेही स्पष्ट उत्तरं न मिळाल्याने अजूनही संभ्रम कायम आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.