ylliX - Online Advertising Network

पोलीस उपनिरीक्षकाला ड्युटीवर हजर दाखवून त्यांच्या बँक खात्यातून Rs १२ लाख अपहार

महाराष्ट्र पोलिस अकादमी मधील प्रकार पोलिसांना धक्का

नाशिक : नाशिक शहरात असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाला ड्युटीवर हजर दाखवून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर १२ लाख रुपये काढून अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरच्या प्रकरामुळे पोलीस दलात मोठा धक्का बसला आहे.

सविस्तर वृत्त असे की, पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल झालेल्या दुष्यंत पाटील यांनी अपघातामुळे प्रशिक्षण पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण  होण्याआगोदर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन पोलीस खाते सोडले होते. त्यानंतर पाटील यांना ते कामावर आहेत असे दाखवत  त्यांचा पगार, वेगवेगळे भत्ते त्यांच्या सरकारी बँक खात्यात जमा होत होते. इतकेच नाही तर त्यांनी अकादमीत जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बँकेतून वेळोवेळी जमा करण्यात आलेले असे एकूण ११ लाख ९० हजार रुपये परस्पर काढली आहे. हा सर्व प्रकार २०१४ ते २०१६ या काळात घडला आहे.maharashtra police department news nashik rural

सर्व आर्थिक हेराफेरी उघडकीस आली आणि पोलीस अकादमीच्या सहाय्यक संचालकांकडून गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अकादमीतीलच क्लार्क आणि संबंधित आयडीबीआय बँकेतील कर्मचाऱ्याने परस्पर संगनमताने हा प्रकार केल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय असून त्यांची चौक  शी सुरु केली आहे. अकादमी आणि बँकेतील कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राज्यातील नागरिकांची पोलीस अकादमीत नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच पोलीस अकादमीत हा फसवणुकीचा प्रकार घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सुमारे दोन वर्षे हा प्रकार सुरू असूनही एकाही पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात हा प्रकार नाही. पीएसआयने स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्याचे सर्व रेकॉर्ड बंद का करण्यात आले नाही, असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. अजून असे प्रकार झाले आहेत का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.