ylliX - Online Advertising Network

प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.116 चे दीक्षांत संचलन संपन्न

समाजाचे सेवक म्हणून कार्य करावे – दत्ता पडसलगीकर

नाशिक : खडतर पोलीस प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी देशहितासाठी समाजाचे सेवक म्हणून कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले.महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे पोलिस प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.116 च्या दीक्षांत संचलन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, पोलिस महानिरीक्षक छेरींग दोर्जे, पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, पोलिस अधिक्षक संजय दराडे, प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोर्जे, उपसंचालक नंदकुमार ठाकूर आदी उपस्थित होते.

पोलिस प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.116 च्या दीक्षांत संचलन प्रसंगी आनंद व्यक्त करतांना अधिकारी !

श्री.पडसलगीकर म्हणाले, महाराष्ट्र पोलीसदलात पोलीस उप निरीक्षक महत्वाचा घटक असून पोलिस ॲकडमीत मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करुन उत्कृष्‍ट सेवा द्यावी. पोलीस दलात समाविष्ट झाल्यानंतर संपुर्ण राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची असल्याने त्याअनुषंगाने कार्य करावे. या सत्रात 25 सागरी दलातील अधिकारीकाऱ्यांनी देखील प्रशिक्षण घेतले असल्याने दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले केले.

पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.116 च्या दीक्षांत संचलन

प्रबोधिनीमध्ये शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग मोर्चे, आंदोलनांचे नियंत्रण करतांना तसाच गुन्ह्याची उकल करतांना होणार आहे. शपथ घेतलेले पोलीस अधिकारी म्हणून काम करताना पोलीस दलाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी  केले.

प्रास्ताविकात श्रीमती दोरजे  म्हणाल्या, या सत्रात एकुण 177 प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण पुर्ण केले असुन यात 145 पुरुष व 7 महिला तसेच 25 सागरी पोलिस अधिकाऱ्यांनी 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे व ते पोलीस सेवेत रुजू होत आहेत. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. या प्रशिक्षणाचा जनसेवेसाठी उपयोग होईल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  यापुर्वी झालेल्या शानदार संचलनाचे नेतृत्व चैताली गपाट  यांनी केले.

श्री.पडसलगीकरयांच्या हस्ते  प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.  चैताली बाळासाहेब गपाट यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले. त्यांनाच सर्वोत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण चषक, कायद्यातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिला जाणारा डॉ.बी.आर.आंबेडकर चषक, महिला प्रशिक्षणार्थींना दिल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर चषक आणि आंतरवर्ग प्रशिक्षणासाठी दिला जाणाऱ्या सावित्रीबाई फुले चषक, आधुनिक तंत्रज्ञान व बेकायदेशीर जमाव हाताळणेसाठी उत्कृट प्रशिक्षणार्थी व अभ्यासासाठी सिल्व्हर बॅटन आदी पुरस्काराने गौरविण्यात आले.

अमितकुमार कर्पे यांना द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार तर योगेश कातुरे यांना सर्वोत्कृष्ट वर्तणुकीसाठी एस.जी. इथापे पोरितोषिक प्रदान करण्यात आले. अजयकुमार राठोड यांनी फिजीकल ट्रेनिंग, परेड आणि ड्रेस असे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिले जाणारे तीन पुरस्कार पटकाविले. गुन्हेगारी शास्त्र व पिनालॉजी विषयात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी  पुरस्कार विनोद शेंडकर तर रिवॉल्व्हर व फायरिंग साठी दिला जाणार एम एन कामठे पुरस्कार सचिन सानप यांना प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी खेळाडूचा पुरस्कार विजय राऊत यांना प्रदान करण्यात आला.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.