ylliX - Online Advertising Network

प्लास्टिकबंदी शिथिल करणार; सरकारचे एक पाऊल मागे

व्यापारी वर्गाची नाराजी लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने 23 जून पासून लागू करण्यात आलेली प्लास्टिक बंदी काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे परिपत्रक गुरुवारी (दि. 28) काढण्यात येणार आहे. उद्यापासून किराणा दुकानदारांना पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरण्यास मुभा देण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. maharashtra plastic ban relaxed some extends shopkeepers allowed use carrybags

प्लास्टिककबंदी शिथिल करण्याची पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना ही घोषणा केली आहे. किराणा तसेच इतर दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सुट्ट्या वस्तू बांधून देऊ शकणार असल्याबाबतचे परीपत्रक गुरुवारी काढण्यात येणार आहे.

पाव किलोपेक्षा जास्त वजनाचा माल प्लास्टिक पिशवीत विकता येणार आहे. प्लास्टिक पेकेजिंगवर उत्पादकाचं नाव, पत्ता, प्लास्टिकचा दर्जा छापावा लागणार आहे.

प्लास्टिकबंदी केल्यानंतर व्यापाऱ्यांकडून मोठ्याप्रमाणावर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला होता. दंडाची रक्कम मोठी असल्याने व्यापाऱ्यांची मोठी नाराजी होती.

त्याचप्रमाणे सरकारने आधी प्लास्टिकला पर्याय सुचवावा मग दंड वसूल करावा असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरसकट प्लास्टिकबंदीला विरोधच केला होता.

या सर्व बाबींचा विचार करता सरकारने एक पाऊल मागे घेण्याचे ठरविले असावे.

maharashtra plastic ban relaxed some extends shopkeepers allowed use carrybags

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.