ylliX - Online Advertising Network

लघुचित्रपट स्पर्धा 2016; शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी ‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी
‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषि विकास, जलसंधारण या विषयावर ‘ महाराष्ट्र माझा शेतकरी राजा ‘ लघुचित्रपट स्पर्धा 2016 ‘ या स्पर्धेची घोषणा राज्य माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी केली आहे.
या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या लघुचित्रपटास 51 हजार तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

महत्वाचे मुद्दे

* स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील.

* लघुचित्रपट हा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा असावा.

* चित्रीकरण HD गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे.

* स्पर्धकांनी 10 नोव्हेंबर, 2016 पर्यंत लघुपट या ई-मेल आयडीवर पाठवावेत. dgiprnwes01@gmail.com

* लघुचित्रपटाचे चित्रीकरण सद्यस्थितीतील असावे.

* स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे, यशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.

* परिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल.

या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज् आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी श्री. सागर कांबळे, सहायक संचालक (माहिती) ८६०५३१२५५५ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “लघुचित्रपट स्पर्धा 2016; शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी ‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’

  1. Fasavnuk aahe. Saprdha chya navane krishi shetrachya success story fukat madhe karun ghyayacha niyojit plan aahe. Film makeranni mehanatine paise kharch karun film pathavalyat parantu ekahi film maker la reply kinva submission che reply milale nahit. Ami aajvar final tarilhahi kalavali nahi. Yanche pahunch itar department sudhha aata fukat madhe spardheche karan sangun film makers cha vapar karun ghet aahet. Kahinni vyajane paise kadhun film banavun pathavalya aahet.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.