ylliX - Online Advertising Network

HSC Result : नाशिक विभागाला तळाचे स्थान, 86.13 टक्के निकाल, राज्याचा एकूण निकाल 88.41%

मुंबई/ नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल आज ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आली होती. Maharashtra HSC Board examination Result 2018 88percent MSBSHSE Nashik last

नेहमीप्रमाणे मुलींनी यात बाजी मारली असून मुलींचा 92.36 तर मुलांचा 85.23% निकाल लागला आहे. एचएससी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.

ऑनलाइन निकाल बोर्डाने पाच वेबसाईट्सच्या लिंक्स दिल्या आहेत. निकाल बघण्यासाठी या वेबसाईट्स वर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक ऑनलाइन आहेत त्यामुळे या सायरस थोड्या प्रमाणात स्लो झाल्या आहेत. SMS द्वारेही हा निकाल बघता येणार आहे. Maharashtra HSC Board examination Result 2018 88percent MSBSHSE Nashik last

बोर्डाच्या अधिकृत www.mahresult.nic.in या संकेत स्थळासह पाच लिंक्स प्रकाशित केल्या आहेत. तेथे निकाल पाहता येईल. आज विद्यार्थ्यांना केवळ डिजिटल गुणपत्रिका डाऊनलोड करता येणार असून गुणपत्रिकेची मूळ प्रत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वितरीत केली जाईल.

अशा आहेत लिंक्स :

www.mahresult.nic.in , www.result.mkcl.org , www.maharashtraeducation.com , www.knowyourresult.com , www.hscresult.mkcl.org

कोकण विभागाने सर्वाधिक (94.35%) निकाल दाखवत पहिला क्रमांक पटकावला तर नाशिक विभागाने तळाचे स्थान गाठत 86.13 टक्के इतका निकाल दिला आहे.

एकूण निकाल – 88.41 टक्के

उत्तीर्ण मुले -85.23  टक्के, उत्तीर्ण मुली – 92.36 टक्के, अपंग – 91.78 टक्के

कला – 78.93 टक्के, विज्ञान- 95.85 टक्के, वाणिज्य- 89.50 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम- 82.18 टक्के

विभागा नुसार असा आहे निकाल –

कोकण- 94.85 टक्के
कोल्हापूर- 91 टक्के
औरंगाबाद- 88.74 टक्के
पुणे- 89.58 टक्के
नागपूर- 87.57 टक्के
लातूर- 88.31 टक्के
मुंबई- 87.44 टक्के
अमरावती- 88.08 टक्के
नाशिक- 86 .13 टक्के

Maharashtra HSC Board examination Result 2018 88percent MSBSHSE Nashik last
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.