पालकमंत्र्यांकडून शहीद संदीप ठोक यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
नाशिक राज्याचे वैद्यकीय, शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्रविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील शहीद संदीप ठोक यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रशांत मोहिते, तहसीलदार मनोज खैरनार आदी उपस्थित होते.
शहीद संदीप ठोक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून नव्या पिढीला त्यांच्या बलिदानातून देशभक्तीची प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे स्मारक गावात उभारण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्याला दुःख झाले आहे. शासन त्यांच्या कुटूंबियांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहील, असे श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले. राज्यातील जनतेच्या भावना शहीद जवानांच्या कुटुंबियांसमवेत आहेत, असेही ते म्हणाले.