Maha Govt Formation Updates : जिल्ह्यातील एकमेव काँग्रेस आमदारांला भाजपची ऑफर! भुजबळांचा वृत्तास दुजोरा

काँग्रेसचे गंभीर आरोप; भाजपा करतंय फोडाफोडीचे प्रयत्नकडून फोडाफोडीचे प्रयत्न

Maha Govt Formation Updates

मुंबई: शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद देण्याच्या तयारीत नसलेला भाजप आता शिवसेना दबावाला जुमानत नसल्याचे पाहून भाजपने सत्ता स्थापनेच्या उद्देशाने काँग्रेसच्या आमदारांना चर्चेसाठी मुंबईला चला अशा आशयाचे फोन येत असल्याचे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचे काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार हिरामण खोसकर सांगितले. हे फोन कशासाठी येत असावेत याची समज सामान्य नागरिकांना असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत आपण काँग्रेसशी एकनिष्ठ राहू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

याबाबत भुजबळांनी वृत्तास दुजोरा दिला असून राज्यात लवकर सरकार स्थापन व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी पुढील एक महिन्यात सर्व सुरळीत राहील असा अंदाज भुजबळांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप फेटाळले असून हे आरोप सिद्ध करा नायथा माफी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपाकडून आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी सर्व आमदारांना फोन रेकॉर्ड करण्याच्या सूचना केल्याची माहिती दिली.

काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांच्या बोलण्यानंतर खोसकरांशी संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला कोणाचाही दबाव नसल्याचे सांगितले मात्र नंतर आपल्याला फोन आल्याचं म्हटलं आहे.

वडेट्टीवार यांनी सर्व काँग्रेस आमदारांना आपापले फोन टॅप करून रेकॉर्डिंग करण्याबद्दलच्या सूचना केल्या आहेत. कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी आता कोणी फुटून बाहेर निघण्याचा प्रयत्न केल्यास सर्व विरोधी पक्ष मिळून एकच उमेदवार देऊन त्याला पाडू. प्रतारणा केलेली खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.

Maha Govt Formation Updates

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.