ylliX - Online Advertising Network

indore bus accident :अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली.13 जणांचा मृत्यू

इंदूरहूनindore bus accident अमळनेरकडे येणारी एसटी बस मध्यप्रदेशातील धारजवळच्या नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे. अद्याप 25 जण बेपत्ता असून, घटनास्थळी मदत व बचावकार्याला वेग आला आहे. आज सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. indore bus accident

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या जळगाव डेपोची इंदूर-अमळनेर-इंदूर (MH 40 N 9848) ही बस आज सकाळी 7.30 वाजता इंदूरहून निघाली होती. या बसमधून 50 ते 55 लोक प्रवास करत होते. तांत्रिक बिघाडामुळे ही बस धारमधील खलघाट संजय सेतू पुलाचा कठडा तोडून 25 फूट नर्मदा नदीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्याला वेग आला आहे. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली आहे. या अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. बसमध्ये महाराष्ट्रातील कितीजण होते याची आकडेवारी अद्याप मिळू शकलेली नाही. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काय घडली नेमकं घटना?

इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळल्याचे वृत्त असून यात ४० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची एमएच ४० एन९ ८४८ क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती . तेथून रिटर्न प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस सकाळी कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एस. टी. खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले आहे.

 

इंदूरमध्ये एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. ‘हा पूल जुना आहे. बस ही वेगाने जात होती. ओव्हरटेक करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलाचा कठडा तोडून बस नर्मदा नदीच्या पात्रात कोसळली. बसमध्ये 15 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूमचे प्रमुख बाळासाहेब खिस्ते यांनी माहिती दिली.

इंदूरमध्ये एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघाबद्दल  आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूमचे प्रमुख आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी बाळासाहेब खिस्ते  यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला,

MP Bus Accident

चंद्रकांत पाटील चालक होते, तर चौधरी हे वाहक होते. एकूण 40 प्रवाशी होते. सकाळी 10.30 वाजता आम्हाला एक फोन आला होता. आमचं राज्य कंट्रोल युनिट आहे. मध्यप्रदेशमध्ये काय घटना होते. याची माहिती आम्हाला मिळत असते. घटनेची माहिती मिळताच आपातकालीन टीमला माहिती देण्यात आली. त्यानंतर इंदूर, खरगुणची टीम आणि धारची टीम घटनास्थळी रवाना झाली. आतापर्यंत 15 जणांना मृत्यू झाला आहे. 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण 40 प्रवाशी होते, अशी माहिती खिस्ते यांनी दिली.

‘ज्या ठिकाणी हा अपघात घडला आहे तिथे मुसळधार पाऊस सुरू आहे. पुलावर एक कार बसच्या मागे होती. कारचालकाने माहिती दिली की, बसही ओव्हरटेक करत होती. पण अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळली.   बसचा वेग हा जास्त होता. बसचे चारही चाकं वर होती. त्यामुळे बस जेव्हा नदीत कोसळली त्यावेळी बसच्या काचा फोडून प्रवाशी बाहेर आले असावे, जे मृतदेह सापडले आहे ते बसमध्येच होते. नदीची खोली किती आहे, याचा माहिती घेतली जात आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.  या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.

अपघातातील 8 जणांची ओळख पटली

1.चेतन पिता राम गोपाल जांगीड, (राहणार, नांगल कला गोविंदगढ जयपूर राजस्थान)

2.जगन्नाथ पिता हेमराज जोशी  (वय 70, मल्हारगढ, उदयपूर, राजस्थान)

3.प्रकाश पिता श्रवण चौधरी (वय 40, शारदा कॉलोनी अमळनेर, जळगाव महाराष्ट्र)

4.नीबाजी पिता आनंदा पाटील, (वय 60, राहणार अमळनेर)

5. महिला कमलाबाई, पती निबाजी पाटील (वय 55, राहणार, अमळनेर जळगाव)

6.चंद्रकांत  एकनाथ पाटील, (वय 45, राहणार अमळनेर जळगाव

7.श्रीमती अरवा मुर्तजा बोरा (वय 27 राहणार, मूर्तिजापूर अकोला महाराष्ट्र)

8.सैफुद्दीन अब्बास निवासी, (नूरानी नगर इंदूर)indore bus accident 

MP Bus Accident

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.