एम.डी. ड्रग्स तयार करणारे मुंबईतील २ रिसर्च सायंटीस्ट जेरबंद, ३ कोटी २१ लाख रुपये मुद्देमाल जप्त

अंमली पदार्थ रॅकेट : एम.डी. ड्रग्स तयार करणारे मुंबईतील  रिसर्च सायंटीस्ट  दोघे जेरबंद

आजपर्यंत मुंबई सह इतर भागातून  ७ आरोपी जेरबंद ,
भोईसर येथे ड्रग्ज बनवायची प्रयोशाळा

नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट ने जोरदार कारवाई केली आहे. पोलिसांनी अंमली पदार्थ रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी  पोलिसांनी एम.डी. २५ किलो ड्रग्स, ३ कोटी २१ लाख रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. ड्रग्स तयार करणारे रिसर्च सायंटीस्ट सह दोन आरोपी पकडले असून,  आजपर्यंत मुंबई सह इतर भागातून  ७ आरोपी जेरबंद  केले आहेत. पत्रकार परिषदेत पोलिसांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि. १६ मे रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती, त्या नुसार पोलिसांनी कारवाई करत इंदिरानगर पोलिस स्टेशन हद्दीतील भागात सापळा रचत रणजीत मोरे , पाथर्डी फाटा, नाशिक पंकज दुंडे वृंदावन नगर, जत्रा हॉटेल, नाशिक, नितीन भास्कर माळोदे आडगाव, नाशिक यांना २६५ ग्रॅम अंमली पदार्थ एम.डी. पदार्थसह पकडले होते. एकूण १५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्द्माल जप्त केला होता.

गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी याचा तपास सुरु केला तेव्हा याचे थेट सबंध मुंबई येथे असल्याचे समोर आले होते.  यावर लगेच कारवाई करत पोलिसांनी नदीम सलीम सौराठीया, नागपाडा, मुंबई व सफैतेउल्ला फारूक शेख मिरारोड, यांना मुंबई येथून ताब्यात घेतले होते.

त्यांच्याकडून २२०० ग्रॅम वजनाचा ४४ लाख रुपयांचा ड्रग्स आणि ८० लाख रुपयांची जग्वार कार पोलिसांनी असा एक कोटी २४ लाख रुपयांचा मुद्द्माल संशयित ताब्यात घेतले  होते . तर हा माल अरविंद कुमार याच्याकडून येतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र अरविंद हा मुंबईतून उत्तर प्रदेश येथे फरार झाला होता.

पोलिसांनी  गुन्हे शाखा एकचे विशेष पथक उत्तर प्रदेशमध्ये त्याच्या मागावर पाठवले  होते. अरविंद याला पोलिसांनी मुज्फरनगर येथून सापळा रचून अखेर पकडले. अरविंद कुमार याची सखोल चौकशी केली असता, त्याने ओर्गेनिक केमिस्ट्री मध्ये एम.एस्सी. केल्याचे समोर आले. तर तो रिसर्च सायंटीस्ट म्हणून काम करत होता असे समजले. त्याने मुंबई येथे बोईसर येथे एका ठिकाणी छोटी प्रयोगशाळा टाकून हे ड्रग्ज तयार करतो असे सागितले.

ही माहिती कळताच नाशिक येथून दुसरे पथक बोईसर  येथे दाखल झाले, अरविंद ने सांगितलेल्या ठिकाणी छापा टाकला, येथून हरिश्चंद्र उर्वादत्त पंत २४ रा.बोईसर , याच्या सह ४ हजार ५०० ग्रॅम अंमली पदार्थ एम.डी. हा तयार करण्यासाठी लागत असलेली कुड पाउडर १८ किलो, प्रयोगशाळेतील साहित्य, असे एकूण १ कोटी ८० लाख ४७ हजार २२० रुपयांचा माल जप्त केला. आता पर्यंत या प्रकरणात ३ कोटी २० लाख ८८ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

यातील अरविंद आणि पंत दोघेही संशोधक आहेत.ही सर्व कारवाई आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त गुन्हे विजय मगर, पोलीस उपायुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. युनिट १ आनंद वाघ, सपोनि महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गरमे, चंद्रकांत पळशीकर, पोपट करवाळ, झाकीर शेख, रविद्र बागुल, अनिल दिघोलेम इ. कारवाई पूर्ण केली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.