व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याजवळील तीन लाखाची रोकड पळवली आहे. नाशिक शहराचे जूने पोलीस आयुक्तालयाजवळील कुलकर्णी गार्डन मागील कुलकर्णी कॉलनीतील गजानन स्मृती या अपार्टमेंटच्या वाहनतळात आज शनिवार ( दि.३०) रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. Luters robbed merchant 3 lakh near old cp office nashik police crime news
तिघा लुटारूंनी पिस्तुलने गोळी झाडत व्यापाऱ्याची लूट केली. तीन ते पावणेचार लाख रूपयांची बॅग लुटली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुनम एन्टरप्रायजेस या होलसेल वैद्यकिय साहित्य विक्रीचे दुकानाचे काम पूर्ण करत मालक विराग चंद्रकांत शाह (३८) आपल्या कुलकर्णी गार्डन मागे असलेल्या साधुवासवानी मार्गावर कुलकर्णी कॉलनीतील गजानन स्मृती अपार्टमेंट मध्ये दुचाकीवर त्यांच्या घरी पोहोचले.
मात्र नियोजनपूर्वक सुरवातीपासून शहा यांचा पाठलाग करत एका स्पोर्टसबाईकवरून तीघे युवक आपर्टमेंटच्या पार्कींग मध्ये पोहोचले. तीघांपैकी एकाने त्यांच्या दिशेने आपल्याजवळील पिस्तूल (एअर गन) धरत थेट फायर केले. यामुळे घाबरलेले शाह पार्किंगमधून वर फ्लॅट कडे पळत होते.
त्याच वेळी त्यांच्या हातातून कॅश असलेली बॅग दोघा हल्लेखोरांनी ओढली आणि गाडीवरून वेगात पळाले.
यावेळी ज्याच्या हातात पिस्तुल होते तो लुटारू वाहनतळातून चालत बाहेर आला. यावेळी समोरील बंगल्यावरील चौकीदार धावत आल्याने त्याने त्यांच्या दिशेने पिस्तुल रोखून त्यांना धमकी दिली.
ते सुद्धा बंदुकीचा धाकाने लपले. आणि हल्लेखोर दोघा साथीदारांच्या सोबत दुचाकीवर बसूवून वेगात फरार झाला.
या घटनेची माहिती विराग यांनी पोलिसांना फोनवरून कळवल्यानंतर नंतर उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय सांगळे, सोमनाथ तांबे आदी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि वेगात तपास सुरू केला.
गावठी कट्टयाने झालेल्या गोळीबाराचे कुठलेही पुरावे वाहनतळाच्या परिसरात आढळून आले नाही. त्यामुळे हल्लेखोरांनी ‘एअर गन’चा धाक दाखवून आवाज करत जबरी लूट केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी सर्व ठिकाणी नाकेबंदी करत तपास सुरू केला आहे.