कॉलेज रोड परीसरातील पाटील लेन क्रमांक चार येथे इमारतींत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या युवतीचा खून झाला असून तिचा मृतदेह सत्यंम लीला टॉवर येथे आढळून आला आहे. तरुण तरुणींनी गजबजलेल्या या प्रसारात अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हे सर्व प्रकरण समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशी नुसार या मुलीचा खून झाला असून तो मध्यरात्रीच्या सुमारास झाला आहे. गंगापूर रोड पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. कॉलेज रोडवरील आर्चीस गॅलरी जवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी रात्री घराकडे जाणाऱ्या अविनाश शिंदे यांचा खून करून २ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक खूनाची झाल्याची घटना घडली आहे.
लग्न केल्यानंतर माहेरी राहत असलेल्या प्रेयसीचा प्रियकराने गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कॉलेजरोड परिसरात बुधवारी उघडकीस आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून संशयित प्रियकर फरार आहे. या संदर्भात गंगापुर पोलीस ठाण्यात प्रियकरा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तीनमजली अपार्टमेंट असलेल्या सत्यंम लीला टॉवर येथे तपोवन पंचवटी येथील रहिवासी असलेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. एका तरुणाने पोलसांना याबदल माहिती दिली. या मुलीची ओळख तिची आई आई सरला संजय परदेशी (३९,रा.पद्मावती सोसा. तपोवन) यांनी पटविली आहे. या तरुणीचे नाव पायल जयेश दामोदर (२०) असे आहे. पायल ही च्या युवकासोबत राहत होती तो जयेश दामोधर घटनेनंतर शहरातून फरार झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे, पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटना स्थळी दाखल होत त्यांनी अनेक पुरावे गोळा केले आहेत.

तपोवन परिसरात राहणारी पूर्वाश्रमीची पायल परदेशी (२०) हिची कॉलेज रोड परिसरात कामास असलेल्या जयेश दामोदर याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर काही महिन्यांपूर्वी या दोघांनी घरच्यांच्या अपरोक्ष मंदिरात माळ टाकत लग्न केले. मात्र याची कोठेही कागदोपत्री नोंद नाही. लग्नानंतर काही दिवसातच जयेश पायल ला वेगवेगळ्या कारणांवरून त्रास देत होता. हा त्रास असह््य झाल्याने पायल गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी राहण्यास आली होती. यावरूनही त्यांच्यात काही वाद होते. बुधवारी जयेश ने पायलला कॉलेज रोडवरील व्हिजन कॉम्पलेक्स परिसरात भेटण्यासाठी बोलाविले होते. या इमारतीत तो कामास आहे. बोलण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर ती दोघे गेली मात्र त्यावेळी त्यांच्यात काही वाद झाल्याने जयेश ने रागाच्या भरात तिचा गळा दाबत खून केला. तेथुन तो फरार झाला. असा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे.
गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे हे पोलीस कर्मचारी तपास करत आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तिचा फरार प्रियकर आणि इतरांची पोलिसांनी कसून तपासणी सुरु केली आहे.
Like Our page : https://www.facebook.com/NashikOnWeb/