तिने केली लग्नाची अपेक्षा त्याने केला तिचा निघृत खून

प्रेम आहे असे म्हटले तर लग्नाची अपेक्षा करणे चुकीचे ठरत नाही.मात्र एका मुलीच्या आयुष्यात प्रेम आणि लग्न यामुळे मोठी उलथापालथ झाली.त्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यावर प्रेम केले त्यानेच तिचा खून करत तिच्या मृतदेहाची विटंबना केली आहे. नाशिक पोलिसांनी या नराधमास अटक केली आहे.

नाशिक रोड येथील गवळीवाडा भागात ३० मे रोजी एका युवतीचा मृत देह आढळला होता.तर तो ओळखू येवू नये म्हणून त्या मृतदेहाला जाळून टाकले होते. मात्र पोलिसांनी प्रयत्न करत त्या मुलीची ओळख पटवली होती. म्हसरूळ येथील रहिवासी असलेल्या हर्षदा आहिरे असे या तरुणीचे नाव होते.या तरुणीच्या आई बाबांनी ती हरवल्याची माहिती पोलिसांना कळवली होती. त्यामुळे पोलिसांनी चक्रे फिरवत बेपत्ता तरुणी हर्षदा असल्याचे निष्पन केले होते. मात्र तिचा खून कोण करेल असा प्रश्न पोलिसांना पडला होता. हर्षदच्या फोन आणि इतर पुरावे तपासल्यावर पोलिसांनी तिचा प्रियकर रोहित रवींद्र पाटील (२१, मयुरेश्वर डुप्लेक्स, शिंदे मळा, अशोकनगर, सातपूर ) याला बोलावून घेतले होते. रात्री त्याला पोलिसांनी त्यांच्या भाषेत विचारणा करताच आधी उडवाउडवीची उत्तरे देत त्याने हा सर्व प्रकार कबूल केला.लग्नाचा तकादा लावते म्हणून तिचा खून केला असे त्या नराधम ने कबूल केले.

खून झाला त्या दिवशी हर्षदा ने पाटील सोबत आपण लग्न कधी करायचे अशी विचारणा केली होती.यावर त्यांच्यात वाद झाला होता. पाटील ने  हर्षदाला आपल्या घरी घेवून गेला आणि हत्याराने तिच्यावर वर करत तिचा खून केला. यामध्ये तिचा मृत देह कोठे टाकायचा म्हणून त्याने हर्षदाचे मृत शरिर एका मोठ्या बॅग मध्ये टाकले आणि मोपेडवर तिला घेवून तो एकलहरे कडे निघाला होता. निर्जन स्थळ त्याने हेरले.तिचे शरिर बाहेर काढत सोबत आणलेल्या रॉकेल तिच्यावर टाकून ते शरिर पेटवून दिले.ती जळत असताना त्याने या ठिकाणाहून पोबारा केला. हे सर्व झाल्यावर सुद्धा हा निर्लज्ज नराधम हर्षदच्या घरी गेला आणि ती सापडली का ? काही माहिती कळली का ? अशी विचारणा या नराधमाने केली होती.

पोलिसांनी सर्व पुरावे आणि माहिती गोळा केली असून या नराधम रोहित पाटीलला अटक केली आहे.लग्नाचे स्वप्न बघत असलेल्या हर्षदाला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणताही निर्णय घेताना आपले पालक किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तर कोणतीही शंका अथवा जीवाला कोणाकडूनही धोका असल्यास पोलिसांकडे जाणे गरजेचे आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.