ylliX - Online Advertising Network

प्रेमी मावसभावाने केला छळ, नुकतीच लग्न करून गेलेल्या नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक : धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकर असलेल्या मावसभावाने केलेल्या छळाला कंटाळून नुकतीच विवाह करून गेलेल्या नवविवाहिनतेने कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेतला आहे.नाशिकरोड पोलिसांनी नवविवाहितेच्या मोबाईलवरून तिचा प्रियकर असलेल्या मावसभावाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याच जाचास कंटाळून तिने आत्महत्त्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मावसाभाऊ-बहिणीतील प्रेमसंबंधामुळे खळबळ आणि धक्का बसला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी  महेश नाना पांडव (रा. अक्राळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यास अटक केली आहे.या मृत विवाहितेचे नाव मोहिनी उजेश गवारे (वय 21, रा. इंदिरा आवास योजना, खंडेरावनगर, कडवा कॉलनीच्या पाठीमागे, शिंदेगाव, नाशिकरोड) असे आहे.love relative brother sister lover pressure newly married girl suicide  

या गंभीर प्रकरणात मोहिनीचा उजेश गवारे याच्याशी तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र मोहिनीचे विवाहापूर्वीच नात्याने मावसभाऊ असलेला संशयित महेश पांडव याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते.मात्र मोहिनीचा विवाह झाल्यानंतरही संशयित महेश पांडव हा मोबाईलच्या माध्यमातून तिच्याशी संपर्कात करत असे, सतत तिला मोबाईलवरून मेसेज पाठवून वा फोन करून छळ करत  होता. त्याच्या धमक्या आणि छळाला कंटाळूनच मोहिनी हिने सोमवारी (ता.23) सायंकाळी राहत्या घरामध्ये गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.love relative brother sister lover pressure newly married girl suicide  

तिच्या नातलगांनी सासरच्या मंडळीवर आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याप्रकरणी तिची आई सुशिला गायकवाड (रा. गांधीनगर, निळवंडी रोड, दिंडोरी) यांनी तक्रारही दिली होती. मात्र पोलिसांनी संशयित महेश पांडव यास आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मजगर, उपनिरीक्षक होनमाने यांच्यासह पोलीस कर्मचारी आत्महत्या केली त्या ठिकाणी दाखल झाले. चौकशीमध्ये मोहिनीचा विवाह तीन महिन्यांपूर्वी झाल्याचे समजले होते. यात पुरावा म्हणून पोलिसांनी मोहिनीचा मोबाईल ताब्यात घेतला होता. त्याची सखोल तपासणी केली असता, एका क्रमांकावरून तिला सतत संपर्क साधण्यात आले होते.

पोलिसांनी माहिती घेतली असता, तो क्रमांक तिचा मावसभाऊ संशयित महेश पांडव याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर दोघांमध्ये असलेल्या प्रेमसंबंधाची त्याने कबुली दिली. तर आत्महत्त्या करण्यापूर्वी मोहिनीला संशयित महेश याने संपर्क साधला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई करत आहेत.love relative brother sister lover pressure newly married girl suicide

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.