ylliX - Online Advertising Network

प्रेम सबंधातून राडा : गंजमाळ येथे एका तरुणाचा खून, ९ ताब्यात

एकाच्या मैत्रिणी सोबत दुसऱ्याने प्रेम सबंध ठेवल्याच्या रागातून झालेल्या जबरदस्त राड्यात एकाचा खून झाला आहे. गंजमाळ परिसरात युवकाचा चॉपर आणि धारधार हत्याराने खून झाला आहे. यामध्ये अरबाज शेरू पठाण या तरुणाच्या खून झाला असून, हा तरुण फक्त मित्राचे काय भांडण झाले हे बघण्यासाठी गेला होता. मात्र तो प्राणास मुकला आहे. पोलिसांनी ९ संशयित आरोपी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १५ रोजी भीमवाडी झोपडपट्टी परिसरातील मोकळ्या जागेत विशाल भगवती आणि त्याच्या दोन मित्रानी कुणाल अनिल कोरडे याने त्याचा मित्र कुणाल कापसे याच्या मैत्रिणी सोबत प्रेमसबंध ठेवले होते, याच रागातून त्याची कुरापत काढत आगोदर त्यांना मारहाण केली होती. कुणाल अनिल कोरडे याचा जिवलग मित्र अरबाज असल्याने मदतीसाठी त्याला बोलावून घेतले होते. अरबाज जेव्हा आला तेव्हा विशाल भगवती याच्या मडक्या नावाच्या मित्राने दोन तीन चापटी मारून दम देवून हाकलून दिले होते.

मात्र प्रकरण इथेच थांबले नाही, कुणाल अनिल कोरडे आणि त्याचे मित्र अरबाज, रोहित, विजय, उमेश हे पुढे गप्पा मारत साठ फुटी रोड कडे निघाले होते. त्याचवेळी कल्पना स्टोर समोर गंजमाळ येथे मडक्या उर्फ कुणाल पगारे, विशाल भगवती यांच्या सोबत बॉबी जगदाने, गौरव उर्फ बटाट्या उन्हवणे , राहुल लहानगे ,कुणाल कापसे, विकी पाटील , चेतन इंगळे, अनिकेत टोपले, पंकज आहेर, इतरांनी मिळून जोरदार राडा करत पुन्हा सर्वाना माराहण केली. यावेळी  भगवती याने मडक्या आणि बॉबी जिंदाल ने चॉपर  ने वार केले तर भगवती ने चाकूने अरबाज यास भोसकले, त्याच्या छातीवर, पोटावर, हातावर, गंभीर जखमा करून त्यास जीवे ठार मारले.  याबात कुणाल अनिल कोरडे याच्या फिर्यादी नुसार भद्रकाली पोलिस ठाणे येथे भादवी कलम ३०२, १४३,१४७, नुसार गुन्हे दाखल केले आहे.

young boy murdered ganjamal shalimar nashik crime news
अरबाज

पोलिसांनी कारवाई करत. ९ आरोपी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये कुणाल बापू कापसे मल्हार खान, अनिकेत नितीन टोपले गोळे कॉलनी, गौरव दिलीप उन्हवणे काकडबाग , बॉबी बथूवेल जगदाने मल्हारखान , विशाल बेकारौ भगवती, राहुल दत्तू लहांगे भीमवाडी यांना पकडले असून तर इतर तीन अल्पवयीन आहेत.

कुणाल नावाचा गोधळ :

कुणाल नावामुळे इथे मोठा गोंधळ झाला असून, यामध्ये तीन कुणाल आहेत. तर कुणाल नावच्या मुलाचे प्रेम्स्बंध होते कुणाल नावच्या मुलाच्या मैत्रिणीसोबत तर या प्रकारणात अरबाज चा काडीचा सबंध नसल्याने त्याला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी १८ ते २१ वर्षाचे असून, माझ्या भावाला कोणी हात लावला त्याला पाहून घेवू या मानसिकतेतून हे प्रकरण झाले आहे.

(बातीमचे अपडेट आहेत. )

जुन्या वादातून गंजमाळ परिसरात युवकाचा खून

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.