ylliX - Online Advertising Network

Lokkala Exibition ‘अरंगेत्रम’ चित्र प्रदर्शनात लोककला आणि स्त्री शक्तीचा वेध

अंजली भाटे, श्रद्धा शेतकर, सुषमा पाटील, स्वाती बेदमुथा यांचे कलाविश्वात पदार्पण पूर्वीपासून लोककलांच्या माध्यमातून जनसंवाद होत आला आहे. जीवनातले अनेक विषय याच माध्यमातून समाजापर्यत पोहोचत जनजागृती झालेली आहे. असाच प्रयत्न अंजली भाटे, श्रद्धा शेतकर, सुषमा पाटील आणि स्वाती बेदमुथा या महिलांनी केला आहे. नाशिकच्या या चार नवचित्रकारांनी चित्रकार सुहास जोशी यांचे शिष्यत्व स्विकारत एकत्र येऊन अडीच वर्ष विविध लोककला अभ्यासत त्या कुंचल्यातून साकारल्या आहेत. (Lokkala Exibition)

Nashik Arangetram Painting Exhibition 2019
अंजली भाटे, श्रद्धा शेतकर, सुषमा पाटील, स्वाती बेदमुथा यांचे कलाविश्वात पदार्पण सोबत त्यांच्या
गुरु सुहास जोशी

विशेष म्हणजे ‘स्त्री शक्ती’ हा चित्रांचा विषय आहे. याच चित्रांचे ‘अरंगेत्रम : एका नव्या चित्रविश्वात पदापर्ण’हे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारक, छंदोमयी, गंगापूर रोड, येथे आयोजित करण्यात आले आहे. येत्या २६ नोव्हेंबरपर्यत सकाळी ११ ते रात्री ८: ३० वाजेपर्यत सदरच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महिलांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसाय सांभाळून चित्रकला जोपासतांना स्वतंत्रपणे लोककलांचे अध्ययन केले. यामध्ये मधुबनी, वारली, ओरिसा पट्टचित्र, मांडणा, हजारीबाघ, फड पेंटीग, संथल पेंटीग, गोंड, कालीघाट, गुर्जरी, कर्नाटक लेदरपपेट्री, धुलीशिल्प, कलमकारी, चित्रकथी, पिठोरा चित्र यांचा अभ्यास केला. विशेष म्हणजे या महिलांपैकी कुणीही व्यवसायाने चित्रकार नाही. कुणी स्त्रीरोग तज्ञ, आयटी तंत्रज्ञ,  व्यावसायिक अशीच त्यांची ओळख  आहे.

प्रदर्शनात काय पाहाल :

या चित्र प्रदर्शनात ५० हून अधिक चित्रे मांडण्यात आली आहे.  यामध्ये स्त्री शक्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जसे रामायणात  रावण, मंदोदरी आणि सीता यांचे चित्र, चाळीशीनंतर स्त्रियांचे बदलत असलेले जीवन, राजा जनकला जमीन नांगरतांना सापडलेली सीता आहे. भारतीय सण यावर चित्रे रेखाटतांना बैलपोळा, दसरा, वारी मधला आनंद, दहीहांडी, गुढीपाडवा, मकरसंक्रांत, आदी सणांचा आनंद, पावसाचा आनंद, जीवनातली सकारात्मकता, हिंदू संस्कृतीमधली शुभ चिन्हे आदी आहेत. सदरचे विविध विषय हाताळतांना मनाला प्रसन्न करतील असे रंग यावेळी चित्रकारांनी वापरले आहे. त्यामुळे चित्रे अतिशय बोलकी ठरली आहेत.

विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नांना क्युरेटर स्नेहल तांबुळवाडीकर – खेडकर या चित्रकार, कला इतिहासकार आणि समीक्षक यांचीही मोलाची साथ लाभली आहे.(Lokkala Exibition)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.