नाशिक : महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये कोळसाच्या कमतरतेमुळे पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करता येत नसून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. याह परिणाम म्हणून राज्यभरात ग्रामीण भागासह शहरी भागातही भारनियमन करण्याची नामुष्की महावितरण कंपनीवर ओढवली आहे. विजेची मागणी १७,९०० मेगावॉट पर्यंत पोचली असताना केवळ १५,७०० मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे.
सध्या ऑक्टोबर हिटला सुरुवात झाल्यची चिन्हे असून दुपारच्या वेळेला तापमान वाढत आहे. अशावेळी वीज मात्र गुल होत आहे. नाशिककरांमध्ये याबाबत संतापाचे वातावरण असताना शहरात अडीच ते तीन तासाचे भारनियमन करण्यात येणार आहे. तर ग्रामीण भागात सात ते नऊ तासाचे भारनियमन करण्यात येणार आहे.
असे असेल नाशिक शहरातील भारनियमनाचे वेळापत्रक :