मृत्यूकडे पाठ करुन जगा- प्रसिद्ध सर्जन डॉ.राजीव शारंगपाणी यांचे प्रतिपादन

‘मृत्यूकडे पाठ करुन जगा’ प्रसिद्ध सर्जन डॉ.राजीव शारंगपाणीयांचे प्रतिपादन

‘मृत्युकडे पाठ करुन आणि जीवनाकडे चेहरा ठेवून जगायला शिका. वेळ येईल तेव्हा मृत्यु अटळच आहे. पण तो पर्यंत क्वॉलिटी जगणे तुमच्या हातात आहे. तुम्ही किती दिवस जगतात या पेक्षा निरोगी किती राहतात हे महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी कायम शरीर जे सांगेल ते ऐका. आपले शरीर वेळोवेळी आपल्याला अनेक सुचना करत असते. त्या सुचना बारकाईने पाळल्यास तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जाण्याची किंवा औषधोपचाराची गरज भासणार नाही.’ असे प्रतिपादन प्रसिद्ध सर्जनडॉ.राजीव शारंगपाणी यांनी केले.

एचपीटी आर्टस अँण्ड आरवायके सायन्स कॉलेजच्या विदयार्थी सभा व कलामंडळातर्फे स्मार्ट कट्टा-एक मुक्त संवाद ही संकल्पना राबविण्यात गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. कॉलेजच्या कट्टयावर ग्रुप्समध्ये होणारी अनौपचारिक चर्चेला योग्य व्यासपीठ व मार्गदर्शन या स्मार्ट कट्टा माध्यमातून उपलब्ध करण्यात येते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात दुसरा स्मार्ट कट्टा सोमवारी पार पडला. २८ ऑगस्ट रोजी ‘आपली बदलती लाइफस्टाइल’ या विषयावर प्राध्यापक व विद्यार्थ्यांसमवेत मुक्तसंवाद साधण्यासाठी प्रसिद्ध सर्जनडॉ.राजीव शारंगपाणी उपस्थित होते.यावेळी मुक्त संवाद साधतांन डॉ.शारंगपाणी म्हणाले, ‘आजची तरुणाई आउट ऑफ द बॉक्स विचार करणारी आहे. हा विचार खूप चांगला आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीत दुःखी राहणे टाळा.

तुम्हाला दुःख होत असेल तर ते कसे घालवावे हे देखील तुम्हाला माहित असते. त्यामुळे ज्या गोष्टीतून आनंदी राहता येईल तेच करा. कोणतीही गोष्ट करताना समोरच्याचे सल्ले घेण्याची आपल्याला सवय असते. पण ज्या सल्ल्यांमधून तुम्हाला त्रास होत आहे ते सल्ले पाळू नका. आपले शरीर हे पुस्तक आहे ते वाचायला शिका. शरीराला त्रास करुन घेण्यापेक्षा शरीर व मन आनंदी ठेवल्यास निरोगी राहता येते.’

यासोबत डॉ.शारंगपाणी यांनी व्यायामाबाबत प्रश्नांवर संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोणताही व्यायाम पूर्ण नाही. लवचिकता, ताकद, जॉगिंग, सायकलींग अशा सगळ्या प्रकारांचा व्यायाम स्त्री व पुरुष दोघांनीही करायलाच हवा. व्यायामाची सवय लावल्यास आयुष्य आनंदी ठेवता येते.’ विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अनेक प्रश्नांतून ही चर्चा खुलत गेली. शहरातील अनेक श्रोत्यांनी देखील या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे संजोयन प्राचार्य व्ही.एन.सुर्यवंशी, जर्नालिझम व कलामंडळ विभाग प्रमुख डॉ.वृंदा भार्गवे, विदयार्थी विकास अधिकारी डॉ.विजयकुमार वावळे, विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आसावरी कुलकर्णी,राकेश पाटील,चैतन्य जोशी, अश्विनी भालेराव यांनी केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.