लायन्स क्लब नासिक पंचवटी तर्फे नाशिक मधील दंगलग्रस्त गावात सहाय्य
लायन्स मदतीसाठी पुडे सरसावले ,सामाजिक बांधिलकी अंतर्गत उपक्रम
घरांसाठी अधिक सहाय मिळण्यासाठी प्रयत्न करणार : वैद्य जाधव माजी प्रांतपाल
तळेगाव येथील आंदोलनात या भागातील आणि परिसरातील अनेकांच्या घरादाराचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक घरांचे तसेच स्वयंपाकाच्या ,दैनंदिन वस्तूंचे नुकसान झाले आहे. . या घरांना मानसिक व वास्तुस्वरूपी आधार देण्याच्या नात्याने लायन्स क्लूब पंचवटी चे माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव ,अध्यक्ष डॉ नीलिमा जाधव ,अविनाश शिरोडे ह्यांनी ठरवले .या करिता निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर ह्यांच्या मार्गदर्शनाने हि मदत देण्याचे आयोजन केले.
लायन्स क्लब नासिक पंचवटी ही संस्था अशावेळी नेहमीच मदतीसाठी धावून जाते.त्यामुळेच यावेळीही लायन्स क्लब नासिक पंचवटीच्या सदस्यांनी ह्या दंगलग्रस्तांना मदतीचे हाथ सरसावले .माजी प्रांतपाल ला.वैद्य विक्रांत जाधव ह्यांच्या पुढाकाराने व ला.अविनाश शिरुडे, ला.अरुण अमृतकर, ला.प्रवीण जयाकृश्नीया ह्यांच्या सहकार्याने लायन्स क्लब नासिक पंचवटी ने तहसीलदार अनिल पुरे रामदास खेडकर निवासी जिल्हाधिकारी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदे व वाडीव्ह्रारे,सांजेगाव ह्या तीन गावातील ८४ बाधित घरांना पाणी साठविण्याचे हंडे देण्यात आले .तसेच ज्या घरांचे दारे ,खिडक्या उध्वस्थ झाल्या आहेत ते लवकरच दुरुस्त करून देण्यात येतील असे ला.वैद्य विक्रांत जाधव ह्यांनी सांगितले.अनेक घरावरील छत असलेले पत्रे तुटले असून खासगी वितरकाच्या सहायाने ते बदलून देण्यासाठी प्रयत्नशील असून लवकर प्रक्रिया पूर्ण होईल असे माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव ह्यांनी व्यक्त केले .ह्या घरांना महिन्या भाराचे धन्य हि पुराव्यात आले असून कुटुंबांना आधार मिळाला आहे हा कार्यक्रम लायन्स पंचवटीच्या “सामाजिक बांधिलकी” ह्या उपक्रम अंतर्गत राबविण्यात येत आहे .
( प्रसिद्धी पत्रक )