ylliX - Online Advertising Network

यादी द्या शेतकऱ्यावरील गुन्हे सरकारला मागे घ्यायला लावतो – शिवसेना पक्ष प्रमुख

शेतक-यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा निर्णय जरी ऐतिहासिक असला तरी  हा निर्णय कदापीही  समाधानकारक नाही, आज जरी पाहिले तरीशेतक-यांच्या मनात अजूनही असंतोष आहे.तर स्वामिनाथन आयोग लागू झालच पाहिजे आणि पिकला हमीभाव मिळाला पाहिजे  असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नाशिकमधल्या पिंपळगाव येथील शिवसेना संवाद यात्रेत उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हे वर्ष आहे २०१७ आणि शेतकरी आजही कर्ज बाजारी आहे. त्यामुळे सरकारने कर्ज माफी करताना आज पर्यंत अर्थात २०१७ केली पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे, आम्ही म्हणजेच शिवसेनेच्या रेट्या मुळेच  शेतक-यांना कर्जमाफी मिळालेली आहे असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, कर्जमाफीचा निर्णय हा ऐतिहासिक असला तरी समाधानकारक नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.

आज रविवारी २५ जून रोजी पिंपळगावातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. शेतकरी संवाद यात्रा पिंपळगाव ते पुणतांबा दरम्यान होणार आहे. आज दिवसभर उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत.

शेतकरी लढ्याचा इतिहास घडवणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी आज मी इथं आलोय. मराठवाड्यातील शेतकरी कदाचित या कर्जमाफीने उत्सव साजरा करतील, पण ज्या शेतकऱ्यांनी संपाची ठिणगी टाकली ते शेतकरी वंचित कर्जमाफीच्या फायद्यापासून वंचित राहिल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

तसंच दिनांक  1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सरकारनं 2016 ऐवजी 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांना दिलासा द्यावा, कांद्याला हमीभाव द्यावा यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मला यादी द्या सर्व गुन्हे मागे घेतो

शेतकरी आंदोलन सुरु होते तेव्हा ते दडपण्यासाठी सरकारने पोलिस बळाचा वापर केला. अनेक शेतकऱ्यावर गुन्हे दाखल केले आहेत. हे सरकार असे कस करू शकते ? तुम्ही सर्वांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत त्यांची यादी मला द्या. मग बघा मी सरकारला कसे गुन्हे मागे घ्यायला भाग पाडतो, असा दम ठाकरे यांनी सरकारला भरला आहे.

जिल्हा बँक दोषी असे सरकार ओरडत होते. दराडे दोषी असेही म्हणाले, माग कारवाई का केली नाही सरकारने. इतक्या दिवस शेतकरी वर्गाचा पैसा तेथे अडकला होता त्यामुळे किती नुकसान झाले आहे.सरकारने आता यावरील व्याज सुद्धा दिले पाहिजे असे ठाकरे यांनी मागणी केली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.