ylliX - Online Advertising Network

मेरी परिसरात बिबट्या अखेर जेरबंद

नाशिक : गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरातील मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद परिसरात दहशत माजवत असलेला बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. मेरी परिसरातील हायड्रो परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला आहे.

पंचवटी परिसरातील मेरी, हिरावाडी,जगझाप मळा,मखमलाबाद परिसरात दिसनारा बिबट्या अखेर पिंजरयात अडकल्याने परिसरातील नागरिकानी सूटकेचा निश्वास सोडला आहे.

शनिवारी मेरी परिसरात या बिबट्याने मेरीच्या एका संरक्षक भिंतीवर ठाण मांडले होते. त्याचे काही फोटो काढून लोकांनी ते सोशल मिडियावर टाकल्यानंतर व्हायरल झाले होते. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने रविवारी (दि १०) या परिसरात पिंजरा लावला होता.

यापिंजऱ्यात ठेवलेल्या बकरीची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या त्यात अलगद अडकला.

नाशिक शहरातील अनेक ठिकाणी बिबट्याने दर्शन दिले असल्याने त्या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली होते. सर्व परिसर रहिवाशी असल्याने नागरिक मोठ्या दहशती ख़ाली होते मात्र बिबट्या पकडला गेल्याने नागरिकांमधे आनंदाचे आणि सुरक्षित असल्याचे वतावरण आहे.

गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्या दर्शन देत असल्याच्या घटना घडल्या होत्या. सुरुवातील वनविभागाने पिंजरा लावण्यास असमर्थता दर्शवली होती. पिंजरे उपलब्ध नसल्याची सबब देण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी नागरिकांच्या दबावामुळे पिंजरा उपलब्ध करून तो लावण्यात आला. मात्र अपयश आले.

त्यानंतर दुसरा पिंजरा काळ रविवारी (दि. १० ) लावण्यात आल्यानंतर १२ तासाच्या आत या पिंजऱ्यात बिबट्या शेळीच्या शिकारीच्या लालसेने अडकला.

त्यामुळे आता मेरी म्हसरूळ परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नसून ही बातमी जास्तीतजास्त लोकांपायंत पोचवून समाज माध्यमांवर (सोशल मिडिया) परसलेल्या अनेक अफवांना लगाम घाण्यास प्रयत्न करायला हवेत.

बघा त्या बिबट्याचे काही छायाचित्रे : फोटोज (गोकुळ बोडके) नाशिक सिटीझन

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.