ylliX - Online Advertising Network

गंगापूर रोड : सावरकर नगर भागातील उद्यानात बिबट्या; 3 तासाच्या प्रयत्नानंतर जेरबंद

गंगापूर रोड : सावरकरनगर भागात सकाळी आढळून आलेल्या बिबट्याला ३ तासाच्या थरारक घडामोडीनंतर जेरबंद करण्यात यश आले आहे. या परिसरात  राहणाऱ्या नागरिकांत भर वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले होते. leopard sawarkar nagar gangapur road nashik

 

शुक्रवारी (दि. 25) सकाळी परिसरात बिबट्या संचार करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी, पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. खाजगी मिळकतीतून बिबट्या मनपाच्या उद्यानात आला. बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची तो मुक्तपणे संचार करीत राहिल्याने दमछाक होत होती. त्यात जवळून इंजेक्शन देण्याच्या प्रयत्नात वनविभाग कर्मचारी उत्तम पाटील यांच्यावर त्याने हल्ला केला. त्यानंतर शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड हे देखील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले.

 

विविध कंपाऊंड ओलांडत बिबट्या वृत्तांकनासाठी उपस्थित असलेल्या मध्यम प्रतिनिधी जवळ जाऊन पोहचला. तबरेज शेख आणि कपिल भास्कर हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले. leopard sawarkar nagar gangapur road nashik

सोशल मिडिया वरून ही बातमी पसरल्यानंतर बघ्यांनी गर्दी केल्याने बिबट्या आणखीनच बिथरला होता. अतिउत्साही माणसांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे तो आणखीनच जास्त बिथरून जात मोठ्या डरकाळ्या फोडत होता. त्यामुळे त्याला पकडण्यातही अडचणी येत होत्या. त सर्व घटनाक्रमात बिबट्याही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

तीन तासाच्या थरारक घटनानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. तो अग्निशमन दलाच्या जाळीत अडकला. त्याला पिंजऱ्यात मध्ये बंद करण्यात आले.

नष्ट झालेले जंगल, आणि दुष्काळी परिस्थिती यात पाण्याच्या शोधात तो बिबट्या त्याच्या परिसरात अतिक्रमण केलेल्या मानवाच्या वस्तीत घुसल्याचे निदर्शनास येत आहे. नाशिक जीईल्यात अशा अनेक घटना घडत आहेत. त्यावर आपल्याला लाही उपाय सुचत आहेत काय? आम्हाला कळवा.

leopard sawarkar nagar gangapur road nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.