मराठा आरक्षण : वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी तातडीने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेत सकल मराठा समाजाच्या मागण्या आणि मराठा आरक्षणासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक आज दुपारी विधानभवन, मुंबई येथे झाली. या बैठकीला मंत्री  चंद्रकांत पाटील,  सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, सुभाष देसाई,  दिवाकर रावते, एकनाथ शिंदे,  गिरीश बापट, रामदास कदम, विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, वरिष्ठ नेते अजित पवार,  छगन भुजबळ, विनायक मेटे आणि इतर नेते उपस्थित होते. या सर्वपक्षीय बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.leaders unitedly supported Maratha reservation assured support Government

या बैठकीत सर्व नेत्यांनी एकमताने मराठा आरक्षणाचे समर्थन केले आणि त्या दिशेने होणाऱ्या राज्य सरकारच्या सर्व प्रयत्नांना सहकार्य देण्याची तयारी दर्शविली. सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता राखण्यासाठी आवाहन केले आणि कोणत्याही प्रकारचा हिंसाचार वा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करण्यात आले. राज्य मागासवर्गीय आयोगास शक्य तितक्या लवकर आपला अहवाल सादर करण्याची विनंती करण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आला. हा अहवाल येताच वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी तातडीने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, असे एकमताने ठरले.leaders unitedly supported Maratha reservation assured support Government
CM Devendra Fadnavis, Maharashtra Legislative Council Chairman Ramraje Nimbalkar, Assembly Speaker Haribhau Bagde chaired all party meeting at Vidhan Bhavan, Mumbai this afternoon on the demands of Sakal Maratha Samaj and #Maratha reservation issue.
‪Ministers Chandrakant Patil, Sudhir Mungantiwar, Vinod Tawde, Subhash Desai, Divakar Raote, Eknath Shinde, Girish Bapat, Ramdas Kadam, Girish Bapat, Leader of Opposition Radhakrishna Vikhe Patil, Dhananjay Munde, Senior leaders Ajit Pawar, Chagan Bhujbal, Vinayak Mete and other were present.‬
It was also decided in this meeting to request State Backward Class Commission to submit its report as early as possible and post that, a special Session of the State Legislature will be called for statutory compliance.
Here is the joint statement issued after the all party meeting.
All leaders unitedly supported #Maratha reservation & assured all support to Government for the efforts in that direction. All party leaders also appealed for maintaining peace & not to support any kind of violence.leaders unitedly supported Maratha reservation assured support Government

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया :

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. एससी, एसटी, ओबीसी घटकांवर अन्याय न होता हे आरक्षण देण्यात यावे. यासाठी कायदा दुरुस्ती आवश्यक असल्यास ती ताबडतोब करण्यात यावी, घटनेत तशी तरतूद करून घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. दोन तृतीयांश बहुमत होण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब स्वतः सहकार्य करायला तयार आहेत. आंदोलनादरम्यान आत्महत्या, हिंसाचार यापासून सर्वांनी दूर रहावे. मागासवर्ग आयोगाचा निकाल आल्यानंतर जर त्यात कायद्याची त्रुटी असेल आणि बदल गरजेचे असतील तर ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. आम्ही सर्व त्यास सहकार्य करू

leaders unitedly supported Maratha reservation assured support Government

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.