ylliX - Online Advertising Network

लासलगाव रेल्वेस्थानकावर कामायनी एक्‍स्प्रेसला थांबा देण्याची मागणी

लासलगाव येथील रेल्वेस्थानकावर कामायनी एक्‍स्प्रेस या गाडीला थांबा देण्याची मागणी गेल्या १५ वर्षापासून केली जात आहे. मात्र, त्याची सुस्तावलेले रेल्वे प्रशासन व लोक प्रतिनिधींकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. प्रत्येकवेळी फक्त आश्‍वासने देऊन वेळ मारून नेली जात आहे. गेल्या १५ वर्षापासून खासदार तेच अन समस्या तीच आहे. प्रत्येक वेळी निवेदन दिले जाते मात्र कामायनी एक्‍स्प्रेसचा थांबा काही मिळत नसल्याने प्रवासी यांच्यात नाराजीचा सुर आहे. केंद्रात भाजपा सरकार आहे, हरिषचंद्र चव्हाण हे देखील भाजपचे खासदार आहे परंतु अनेक निवेदन देवूनही लासलगांव वासियांची कामायनीएक्‍स्प्रेस या गाडीला  थांबा देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याने खासदार यांचे वजन कमी पडत तर नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
लासलगाव हे कांद्यासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असून, परंतु या रेल्वे स्थानकात सुविधा मात्र काहीच नाही. दररोज शेकडो नोकरदार, विध्यार्थी, व्यावसायिक येथून नाशिक, मुंबई येथे ये-जा करतात. परंतु नाशिकहून सकाळी ११.०० वाजता पैसेंजर  गाडी गेली की त्यांनतर संध्याकाळी ६. १५ वाजे शिवाय एकही गाडी लासलगावला येण्यासाठी नाही. त्यामुळे विध्यार्थांना ताटकळत बसावे लागते.  गेल्या अनेक वर्षापासून लासालगावकर ही मागणी करीत आहेत. अनेक निवेदनही दिले परंतु समस्या मात्र तशीच आहे.
गेल्या पंधरा वर्षांत येथील प्रवासी संघटना व राजकीय नेत्यांनी कामायनी एक्‍स्प्रेसला लासलगाव  स्थानकावर थांबा मिळावा म्हणून आंदोलनदेखील केले आहे. वेळोवेळी निवेदने देखील दिली आहेत. परंतु अजूनही या मागण्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मागणी करूनही रेल्वे प्रशासन गाड्यांना थांबा देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

लासलगाव येथे  रेल्वेची संगणकीकृत तिकीट खिडकी सुरू झाल्यापासून प्रवासी संख्या आणि उत्पन्नात वाढ झाली असली, तरी लोकप्रतिनिधींच्या प्रभावी पाठपुराव्याअभावी लासलगावला नवीन गाड्यांच्या थांब्याबाबत कोणताही निर्णय रेल्वे प्रशासन घेत नाही. या गाड्यांच्या थांब्यासाठी स्वीकारलेला आंदोलनाचा मार्गही कुचकामी ठरला असून, लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षामुळे ती धूळ खात पडली आहे. रोज शेकडो  पासधारक रेल्वेने अप-डाऊन करतात. परंतु दुपारनंतर लासलगाव कडे परत येण्यास संध्याकाळ शिवाय गाडी नसल्याने विध्यार्थांना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे पासधारक विद्यार्थी व नोकरदार त्रस्त झाले आहेत.
उत्पन्न वाढूनही सुविधा नाहीत
लासलगाव रेल्वेस्थानकावर संगणकीकृत तिकीट व आरक्षण सेवा उपलब्ध झाल्यापासून प्रवासीसंख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात तीन ते चार हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. तसेच रेलवेने मोठ्या प्रमाणात कांदा हा पाठवला जातो याचेही मोठे उत्पन्न रेल्वेला मिळते. उत्पन्न वाढवूनही सुविधा मात्र काहीच नाही.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.