नाशिक : नाशिकहून औरंगाबादला जाणाऱ्या शिवशाही बसला विंचूर गावाजवळ टँकरने मागून दिलेल्या धडक दिल्याने झालेल्या अपघातात झाला आहे. यात 30 प्रवासी जखमी झाले असून पाच प्रवासी गंभीर जखमी असल्याचे समजते. त्यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. lasalgaon vinchur shivshahi bus accident 30injured diesel tanker nashik aurangabad
टँकरने दिलेल्या धक्क्याने शिवशाही बसने पाच पलट्या खात रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकालासाठी खोळंबली होती मात्र क्रेनचा वापर करून दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आहेत. उलट पडलेली शिवशाही देखील सरळ करण्यात येऊन जखमींना बाहेर काढण्यात आले आहे.
लासलगाव जवळील विंचूर गावाजवळ हा अपघात झाला आहे. टँकर (MH 04 GC 9077) शिवशाही बस (MH 04 JK 4844) च्या मागून जात असताना डीझेल टँकरचा तयार फुटल्याने बसला त्याचा धक्का लागला. या धक्क्यात शिवशाही बस पलट्या खात बाजूला जाऊन पडली. यात बसमधील ३० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे…
सविस्तर वृत्त लवकरच…