ylliX - Online Advertising Network

लासलगाव : कर्जबाजारी व्यापाऱ्याने स्वतः रचला लुटीचा कट, मावस भावाची साथ

कर्जबाजारी होता हा व्यापारी

नाशिक :नाशिक ग्रामीण पोलिसांनी लासलगाव येथील व्यापाऱ्याच्या ९ लाख लुटीचा प्रकरणाचा छडा लावला असून, धक्कादायक म्हणजे या कांदा व्यापाऱ्याने स्वतःच्याच लुटीचा कट करत हे सर्व घडवून आणले होते. ग्रामीण पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी लासलगाव येथे कांदा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याला लुटण्यात आले होते. Lasalgaon robbery case conspirator merchant looted himself brothers help

दिनांक २३ एप्रिल रोजी लासलगाव येथे भर रहदारीच्या ठिकाणी अॅक्सिस बँकेजवळ शेतीमाल व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची फेकून नऊ लाख लुटल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात चोरांनी राहुल सानप यांना लुटले होते. सानप हे विंचूर येथील रहिवासी आहेत. सानप यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी व्यापाऱ्याने बँकेतून पैसे काढले होते.

असा होता बनाव : लासलगाव : कांदा व्यापाऱ्यांचे नऊ लाख रुपये लुटले; मिर्ची पूड डोळ्यात टाकली

असा लागला गुन्ह्याचा छडा :

या घटनेने पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले, पोलिसांनी फिर्याद घेत चौकशी सुरु केली होते. या चौकशीत सानप यांची माहिती व आणि घडलेल्या प्रकरणातील घटना यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगळेपण दिसून आले होते. तर यामध्ये मोठी गोष्ट उघड झाली की सानप यांना पैश्याची गरज होती आणि त्यांच्यावर कर्ज आहे.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे समोर आले की सानप यांच्या नातेवाईकांसोबत मिळून कर्जबाजारीपणामुळे त्यानेच आपल्या दोन नातेवाईकांसह हा बनाव रचला असल्याचे उघडकीस आले आहे. Lasalgaon robbery case conspirator merchant looted himself brothers help

या चोरीच्या कटात सानप यांचा मावस भाऊ अभिजित भाऊसाहेब सानप, रा. निमगाव, ता. सिन्नर , साथीदार रमेश नामदेव सानप, रा. पाचोरे बु. ता. निफाड हे सामील होते असे उघड झाले.

हा चोरीचा बनाव केलेल्या फिर्यादी राहुल शंकर सानप हे शेतीमालाचे व्यापारी आहेत. त्यांनी मर्चंट बँक व व्यापा-यांचे कर्ज घेतले  होते.  त्यामुळे कर्ज कसे फेडायचे म्हणून त्यांनी हा चोरीचा बनवा करत कट रचला होता. अ‍ॅक्सिस बँकेतून धनादेशाने 09 लाख रूपये काढले होते, परंतु कर्जबाजारी झाल्याने सदरचे पैसे चोरी झाल्याचा बनाव करण्याचा प्लॅन फिर्यादी राहुल सानप यांनीच  केला होता. Lasalgaon robbery case conspirator merchant looted himself brothers help

Lasalgaon robbery case conspirator merchant looted himself brothers help, लासलगाव कर्जबाजारी व्यापाऱ्याने स्वतः रचला लुटीचा कट मावस भावाची साथ nashik rural police station apmc strike agri produce trader market news नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा जनार्दन सोनवणे nashikonweb लुटीचा बनाव, nine lakh rupees robbery Laslgoan onion merchant looted

असा होता बनाव :

या प्रकरणात विंचुर रोडने पुढे जात असतांना गाडीचे टायर पंक्चर झाले असल्याचे बहाण्याने ते खाली उतरले होते, यावेळी ठरल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांचा मावस भाऊ अभिजीत यास पल्सर मोटर सायकलवर येण्यास सांगितले, तसेच त्याचेकडे मिरचीची पुड देवुन गाडीजवळ आल्यावर झटापट करून मिरचीची पुड डोळयात टाकायची व गाडीचे सीटवरील पैशांची बॅग लुटमार करून घेवुन जायची असे ठरले आणि साथीदार रमेश याने घटना घडलेनंतर त्यास दवाखान्यात घेवुन जायचे असे ठरले.

त्याप्रमाणे त्याचा मावस भाऊ अभिजीत याने राहुल याचे डोळयात मिरचीची पुड टाकली व गाडीचे पुढील सिटावरील पैशांची बॅग लुटली होती. तर ठरल्या प्रमाणे साथीदार रमेश याने ठरलेप्रमाणे फिर्यादीस दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले गेले आणि बनवा सफल झाला होता. Lasalgaon robbery case conspirator merchant looted himself brothers help

का केला बनाव?

फिर्यादी राहुल सानप याने कर्जबाजारी झाल्यामुळे पैसे चोरी गेल्याचा बहाना करून त्यांचे कुटूंबियांची फसवणुक केली. फिर्यादीचा मावस भाऊ अभिजीत सानप यास फिर्यादीकडुन 02 लाख रूपये घेणे असल्याने त्यास कटात सामील करून पैसे परत देणार असल्याचेही सांगितले होते.

या प्रकरणी राहुल शंकर सानप, वय 28, ता.निफाड,  अभिजीत भाउसाहेब सानप, वय 26, रा. निमगाव, ता.सिन्नर, रमेश नामदेव सानप, वय 27, रा. पाचोरे ता.सिन्नर यांना ताब्यात घेतले आहे. ताब्यातून चोरीस गेलेले 08 लाख रूपये हस्तगत गेले आहेत.

या प्रकरणी नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि जनार्दन सोनवणे, सपोनि अशिष आडसुळ स्थागुशा, पोउनि डी.एस.मुढे लासलगाव पो.स्टे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोउनि रविंद्र शिलावट, लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोउनि जोपुळे, पोना महाजन, जिवराज इलग, पोहवा भगवान निकम, पोना नंदु काळे, राजु सांगळे, पोकॉ संदिप लगड, यांच्या पथकाने सदर जबरी चोरीचे गुन्हयाचा उलगडला असून संशयिताना ताब्यात घेतले आहेत.

Lasalgaon robbery case conspirator merchant looted himself brothers help

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.