लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण : काकासाहेब नगर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समुह गीत गायन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. Lasalgaon Kakasaheb Wagh Vidyalay Students Starred group song singing competition
क. का. वाघ. शिक्षणसंस्था नाशिक व मुक्तांगण भाऊसाहेब नगर आयोजित जिल्हा स्तरीय समुहगीत गायन व वैयक्तिक गीत गायन स्पर्धा शनिवारी सकाळी क. का. वाघ कृषी महाविद्यालयामध्ये संपन्न झाल्या.
यामध्ये 5 वी ते 7 वी गटात व 8 वी ते 10 वी गटात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. या वेळी परिक्षक म्हणुन गिरीश पांडे व अभिजीत वैद्य यांनी काम बघितले व त्यांच्याच हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. Lasalgaon Kakasaheb Wagh Vidyalay Students Starred group song singing competition
वैयक्तिक गायन स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलोनी वाघ जिल्हा स्तरीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तिचा गौरव चिन्मय दिक्षीत यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत अनुष्का नवले, जागृती आहेर, दिपाली कुशारे, निकीता तिडके, सलोनी वाघ, प्रसाद मत्सागर, प्रतिक पगारे, शाहु गायकवाड, गायत्री शिंदे, जयश्री शिंदे, आकांक्षा सोळशे, संध्या भालेराव, वर्षा बोचरे, भाग्यश्री वाघ, कोमल कुशारे, साक्षी जाधव यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना संगित शिक्षक जगदेव वैरागकर व त्र्यंबक मेधने यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त चांगदेवराव होळकर, समीर वाघ, सचिव के एस. बंदी, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी आभार मानले.