ev charging station वाहन चार्जिंग स्टेशन उभारणे ही काळाची गरज

पेट्रोल,डिझेल,  या इंधनाला इलेक्ट्रीक वाहन हे उत्तम पर्याय असून भविष्यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढविण्यासाठी इलेक्ट्रीक वाहन चार्जिग स्टेशनला प्रात्सोहन देणे ही काळाची गरज असल्याचे उद्योग आणि खनिकर्म,मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.Largest ev charging station Station In India Will Be Set Up In Turbhe

मॅजेन्टा ग्रुप मार्फत भारतातील सर्वात मोठे चार्जिग स्टेशन तुर्भे येथे उभारण्यात आले आहे. या चार्जिग स्टेशनचे उदघाटन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले त्यावेळी श्री. देसाई बोलत होते.ev charging station

यावेळी मॅजेन्टा ग्रुपचे व्यवस्थापक संचालक मॅक्सन लुईस तसेच मॅजेन्टा ग्रुपचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

इलेक्ट्रीक वाहने पर्यावरण पूरक असून त्या वाहनाचा देखभालीचा खर्च सुद्धा कमी असल्याने भविष्यामध्ये पर्यावरण पूरक वाहनाची संख्या वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

तुर्भे येथील चार्जिग स्टेशन 24 तास कार्यरत असुन दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी 21 एसी/डीसी चार्जर उपलब्ध असणार आहेत.या ठिकाणी 45 मिनिटामध्ये वाहन चार्जिग होणार असून ज्या वाहनाना एसी स्लो चार्जिग आवश्यक आहे अशा वाहनासाठी वेगळी मार्गीका विकसित करण्यात आली आहे. हे सर्व चार्जर्स ऑनलाईन रिमोटद्वारे नियंत्रित, चार्जग्रीन ॲपद्वारे ऑपडेट केले असल्याने पूर्णपणे सुरक्षित असल्याचे उद्योगमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.ev charging station

भविष्यात पर्यावरणपूरक वाहनाची संख्या वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील

इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक असून, त्या वाहनाचा देखभालीचा खर्चसुद्धा कमी असल्याने भविष्यामध्ये पर्यावरणपूरक वाहनाची संख्या वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तुर्भे येथील चार्जिंग स्टेशन 24 तास कार्यरत असून, दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी 21 एसी/डीसी चार्जर उपलब्ध असणार आहेत.

45 मिनिटांमध्ये वाहन चार्ज होणार

या ठिकाणी 45 मिनिटांमध्ये वाहन चार्जिंग होणार असून, ज्या वाहनाना एसी स्लो चार्जिंग आवश्यक आहे, अशा वाहनांसाठी वेगळी मार्गिका विकसित करण्यात आलीय. हे सर्व चार्जर्स ऑनलाईन रिमोटद्वारे नियंत्रित, चार्जग्रीन ॲपद्वारे अपडेट केले असल्याने पूर्णपणे सुरक्षित असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने या भूखंडाचा ताबा राज्य शासनाकडे सुपूर्द

दुसरीकडे सिडकोकडून ऐरोली येथील सेक्टर-13 मधील भूखंड क्र. 6 अ हा अंदाजे 3000 चौ. मी.चा भूखंड मराठी भाषा भवन उपकेंद्राकरिता निश्चित करण्यात येऊन दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने या भूखंडाचा ताबा राज्य शासनाला देण्यात आलाय. त्याचप्रमाणे इमारतीची उभारणी करण्याची जबाबदारी शासनातर्फे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास देण्यात आली आहे, अशी माहिती सुभाष देसाई, मंत्री, मराठी भाषा विभाग यांनी दिली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.