ylliX - Online Advertising Network

wildlife smuggling वन्यजीवांच्या तस्करीचे मोठे रॅकेट ,पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासह १७ तस्करांना अटक

Nashik ON web NEWS services :

वन्यजीवांच्या तस्करीचे मोठे रॅकेट नाशिक पुर्व वनविभागाच्या येवला रेंज आणि फिरते दक्षता पथकाने पकडले आहे. नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून एक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासह १७ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीकडून एक मांडूळ व एक मऊ पाठीचे कासव आणि गुन्ह्यात वापरलेल्या महागड्या चारचाकी, दुचाकी वाहने जप्त करऱ्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सोमवारी  दिली.wildlife smuggling

नाशिक जिल्ह्यातील येवला वनपरिक्षेत्रांतर्गत सत्यगाव या खेडेगावात घरामध्ये मांडूळ दडवून ठेवल्याची गोपनीय बातमी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांना मिळाली. त्या माहितीच्याअधारे त्यांनी वनपाल, वनरक्षकांच्या पथकासह संबंधिताच्या घरावर छापा मारून मांडूळसह संशयित आरोपी सोमनाथ रामनाथ पवार (२२) यास ताब्यात घेतले. न्यायालयाकडून त्याची वनकोठडी मिळविल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता वनविभागाच्या पथकाला महत्त्वाचे धागेदोरे हाती आले.  सहायक वनसंरक्षक सुजीत नेवसे यांनी याप्रकरणी पथकाला मार्गदर्शन करत भंडारी, दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल बशीर शेख यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आली.

मिळालेले धागेदोरे तपासत पथकांनी सापळे रचण्यास सुरूवात केली. वडाळीभोई येथून सोमनाथचे नातेवाईक प्रकाश बर्डे, संदीप बर्डे यांना अटक केली. यांच्या सांगण्यावरून सोमनाथने मांडूळचा शोध घेत तो पकडला होता. या मांडूळाची विक्री देवळाली कॅम्प भागातील अंबादास बापु कुवर व थेरगावातील धर्मा देवराम जाधव यांना मांडूळ खरेदी करावयाचा असल्याने पथकाने त्यांनाही संशयावरून ताब्यात घेतले.

या दोघांची वनविभागाच्या पथकाने कसून चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील म-हळ गावातील संशयित संतोष बाळकिसन कचोळे व मनेगावाती किरण पांडुरंग सोनवणे यांची नावे सांगितली.पथकाने त्यांनाही ४ जून रोजी अटक केली. येवला न्यायालयाकडून त्यांची वनकोठडी घेतल्यानंतर तपासी पथकाकडून त्यांची कसून चौकशी केली गेली आणि धक्कादायक माहिती समोर आली.


यामुळे वन्यजीव तस्करीमध्ये नाशिक पुर्व वनविभागाला मोठे यश मिळाले असून ठाणे येथील संशयित सहा.पोलीस निरिक्षक विश्वास बाळासाहेब चव्हाणके (नेमणूक रबाळे पोलीस ठाणे), व पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील रायटर दिपक गोवर्धन धाबेकर यांच्यासह तस्करीच्या गुन्ह्यात सहभाागी संशयित ज्ञानेश्वर विठ्ठलराव वाबळे व निखिल निवृत्ती गायकवाड (रा.कोल्हार) नीलेश रामदास चौधरी (रा.चाकण), संदीप तान्हाजी साबळे (रा.नारायणगाव), महेश हरिश्चंद्र बने (रा.अंबरनाथ), याच्या मुसक्या बांधल्या.एकूण १९ संशयित आरोपींना वनविभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. wildlife smuggling

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.