nashik Kovid-19 नाशिक महानगरपालिका कार्यालयांतर्गत कोविड-१९ विभागीय वॉररूम स्थापन हे आहेत क्रमांक

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोना बाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी या दृष्टीने सर्व विभागातील सर्व विभागीय कार्यालयांतर्गत कोविड-१९ विभागीय वॉररूम स्थापन करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तथा सी बी आर एस सिस्टीमचे प्रमुख सुरेश खाडे यांनी दिली.nashik Kovid-19
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने व नागरिकांना कोरोना बाबतची माहिती व सहकार्य मदत मिळण्याच्या दृष्टीने सर्व विभागातील सर्व विभागीय कार्यालयांतर्गत कोविड -१९ विभागीय वॉररूम स्थापन करण्यात आले आहेत.याद्वारे नागरिकांना सी बी आर एस सिस्टिम,कोरोना केअर सेंटर,होम कोरंनटाइन व लसीकरण इत्यादी बाबतची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी २४x७ स्वतंत्र व्यवस्था विभागवार करण्याचे आदेश मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिले होते. nashik Kovid-19
त्या अनुषंगाने नाशिक पूर्व ,नाशिक पश्चिम, पंचवटी नाशिक रोड,नवीन नाशिक,सातपूर या सहा विभागीय कार्यालयात कोविड -१९ विभागीय वॉररूम स्थापन करण्यात आले असून या वॉररूमच्या माध्यमातून नागरिकांना माहिती उपलब्ध होणार आहे.तरी नागरिकांनी त्यांच्या विभागातील माहिती साठी खालील क्रमांकांवर संपर्क करून माहिती घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तथा सी बी आर एस सिस्टीमचे प्रमुख सुरेश खाडे यांनी करण्यात येत आहे. nashik Kovid-19
कोरोना बाधितांवर उपचारासाठी शासनमान्य दरपत्रक
कोरोना बाधितांवर उपचारासाठी शासनमान्य दरपत्रक
अ.क्र.
विभागीय कार्यालय
वॉररूम संपर्क क्रमांक
१)
नाशिक पूर्व
०२५३-२९४५२९५
२)
नाशिक पश्चिम
०२५३-२५७०४९३
३)
पंचवटी
०२५३-२५१३४९०
४)
नाशिक रोड
०२५३-२४६०२३४
५)
नवीन नाशिक
०२५३-२९४७२९५
६)
सातपूर
०२५३-२३५०३६७
सुरेश खाडे
अतिरिक्त आयुक्त
नाशिक महानगरपालिका,नाशिकnashik Kovid-19
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.