ylliX - Online Advertising Network

कोणार्कनगरला 50 लाख खर्चून साकारणार अद्यावत अभ्यासिका

नाशिक- मुलांच्या व्यक्तिमत्व विकास तसेच करिअरच्यादृष्टीने अभ्यासिका महत्वाची भूमिका बजावतात.स्पर्धा परीक्षा तसेच शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासासाठीची पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने गरजू आणि होतकरुंसाठी तर या अभ्यासिकांचे महत्व अगाध असते. त्यामुळे कोणार्कनागर येथे 50 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणारी अभ्यासिका परिसरातील मुलांसाठी वरदानच ठरेल,असा विश्वास आ.बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला.

           आडगाव शिवारातील कोणार्कनगर येथे ज्ञानेर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या भूखंडावर आमदार सानप यांच्या स्थानिक विकास निधीतून अभ्यासिका उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर आ.सानप बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त कर्नल किशोर पेटकर, नगरसेविका सौ.पुनम सोनवणे सौ.पुनम मोगरे, संस्थेचे अध्यक्ष अशोक कळमकर, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे शहराध्यक्ष माणिकराव देशमुख, धनंजय माने, शाम पिंपरकर, प्रियांका कानडे, प्रशांत बुवा, किसनराव जाधव, मुशीर सय्यद, संस्थेचे संचालक व नागरिक उपस्थित होते.

           नाशकात अभ्यासिकांचे जाळे आहे. त्याचा लाभ उचलून अनेक गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांनी यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांत यश मिळवून ते मोठे अधिकारी बनले आहेत. पंचवटीतील ज्ञानेश्वर अभ्यासिकेचा दररोज 1500 विद्यार्थी लाभ घेतात याची आठवणही आमदारांनी करून दिली. गेल्या 5 वर्षांत मतदारसंघात 450 कोटींची विकास कामे सुरू आहेत. आडगाव परिसरात विकासकामांचा धडाका सुरू आहे. आडगावला उभारण्यात आलेले हायटेक पोलिस स्टेशनची सर्वत्र प्रशंसा होत आहे. आडगावला शालांत मंडळाचे सर्वसुविधांनी युक्त असे कार्यालय साकारणार आहे. पुणे विद्यापीठाचे उपकार्यालय आडगावलाच होणार आहे,असेही आ.सानप पुढे म्हणाले.

           प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अशोक कळमकर यांनी केले. कर्नल सुनील पेटकर यांचेही भाषण झाले. यावेळी नाना शिंदे, सुनील फरताळे, प्रवीण अहिरे, सुनील दराडे, नामदेव हिरे, सुखदेव ढिकले, भारती माळी, आकांक्षा शेवाळे, संदीप लाभडे, सुदाम करंडे, जगन्नाथ कुरणे, पांडुरंग व्यवहारे, दिलीप बुवा, सुरेश मारवाळ, किसनराव जाधव, सीताराम निकम, बाळासाहेब पाटील, निवृत्ती साळवे, हरिकृष्ण सानप, रमेश साबळे, मधुकर निकम, मोहन पवार, वसुंधरा निकम, अरुणा पवार, डी.के .जाधव, पंढरीनाथ जगदाळे, शंकर सौंदाणे, राजेंद्र ढिकले आदी उपस्थित होते. संजय ढिकले यांनी सूत्रसंचालन केले.(Press Note)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.