ylliX - Online Advertising Network

Kite Flyer Boy Dies सिन्नर : पतंगबाजी जीवावर बेतली, पाय घसरुन विहिरीत मुलाचा मृत्यू

नाशिक : सिन्नरमधील संत हरीबाबानगरमध्ये कटलेली पतंग पकडत असतांना शेतातील विहिरीत पाय घसरुन एका मुलाचा मृत्यू झाला. सहावीत शिकणारा आर्यन विलास नवाळे (१२) असे मुलाचे नाव आहे. Kite Flyer Boy Dies

सदरची घटना बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणाची नोंद सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

या घटनेमध्ये आर्यन त्याच्या मित्रांसोबत शेतात पतंग उडवत होता. यावेळी कटलेली पतंग पकडत असतांना तो धनंजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत पाय घसरुन पडला. त्यानंतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. जवळ राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली.

सामाजिक कार्यकर्ते विजय बोऱ्हाडे यांनी घटनेची माहिती सिन्नर पोलीस व नगरपरिषद अग्निशामक दलाला दिल्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आयर्न याला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याला नगरपालिकेच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषीत केले.

Kite Flyer Boy Dies

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.