अपहरण झालेली विवाहिता म्हणते माझे अपहरण झालेच नाही

स्नेहभोजन करून घरी परतत असतानाच रासबिहारी लिंक रोडवर दाम्पत्याची  दुचाकी आडवून पतीला  धक्का देऊन त्याच्याच  समोर पत्नीचे चारचाकी कारमध्ये बसवून अपहरण करण्यात आले होता. मात्र पोलिसांनी शोध घेत असतांना घटनेने विचित्र  वळण घेतले आहे.  अपहृत महिला, अपहरण केलेल्या व्यक्ती आणि तिचे वडील म्हसरूळ पोलीस ठाण्यात स्वतः सर्व  हजर झाले, तर सदर अपहरण झालेल्या महिलेने आपले अपहरण झालेच नाही असे पोलिसांना सागितले, त्यामुळे पोलिस सुद्धा आश्चर्य वाटले.

या प्रकरणी  महिलेचे वडील गुजरात राज्यातील भूज शहरातील जे. के. रुग्णालयात अॅडमिट असल्यामुळे वडिलांना भेटण्यासाठी ही महिला गेलेली असल्याचे तिने स्पष्ट केले. या महिलेस पळवून घेऊन जाणारे व्यक्ती, महिलेची आई आणि वडील आज म्हसरूळ पोलीस ठाण्यात हजर झाले असता महिलेने वडील दवाखान्यात अॅडमिट असल्यामुळे त्यांना बघण्यासाठी रात्री निघून गेल्याचे कारण सांगितले.

तर पतीचा गैरसमज झाल्यामुळे पोलिसांत तक्रार दिल्याचे या महिलेने म्हटले.  नोंद झाली असल्यामुळे याप्रकरणातील सर्वांचे जबाब नोंदविण्यात आले असून पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण :

शनिवारी दिनांक ५ मे २०१८ रोजी  रात्री साडेदहाच्या सुमारास रासबिहारी लिंक रोडवर रोकन सुरेशभाई पोकार (रा. विराणी नाणी, ता. मांडवी, जि. कच्छ भूज, गुजरात, सध्या मानेनगर, पंचवटी)  पत्नीसोबत लामखेडा मळ्यातील मित्र नयन पुरुषोत्तम रंगानी (रा. उमाशक्ती अपार्टमेंट) यांच्याकडे स्नेहभोजनासाठी गेले होते.

ते दोघे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोघेही जेवण करून दुचाकीवरून (एमएच 15 इएल 5383) मानेनगरमधील आपल्या घरी येत होते.

साईश्रद्धा पेट्रोेलपंपाजवळील कॉलनीरोडवर समोर अज्ञात दोन संशयित रस्त्याने समोरून पायी आले आणि त्यांनी ऍक्टिवा दुचाकी अडविली आणि संशयिताने महिलेचा पती रोकन पोकार यांस धक्का दिला , लाल रंगाची आय 10 चारचाकी कार आली आणि संशयितांनी पोकार यांच्या पत्नीला पकडून कारमध्ये बळजबरीने कोंबून चारीही संशयितांनी पोबारा केला होता.

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

अपहृत महिला, अपहरण केलेले व्यक्ती आणि महिलेल्चे आई, वडील हे थेट पोलीस ठाण्यात हजर झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र वडिलांना भेटायचे होते तर असे नाटक का केले ? नेमक काय घडलय हे पोलिस तपास करत आहेत.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.